चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:59 PM2019-01-16T20:59:11+5:302019-01-16T21:36:25+5:30

चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

China's One Belt One Road project news | चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात

चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात

Next
ठळक मुद्देचीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या प्रकल्पात केलेल्या मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे चीन अन्य देशांमधील जमिनीवर लष्करी आणि रणनीतिक वर्चस्व मिळवेल वन बेल्ट वन रोड या प्रकल्पामधून चीनने अवलंबलेल्या विस्तारवादी धोरणामुळे अमेरिकन संरक्षण विभाग चिंतित

वॉशिंग्टन - चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या प्रकल्पात केलेल्या मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे चीन अन्य देशांमधील जमिनीवर लष्करी आणि रणनीतिक वर्चस्व मिळवणार आहे. त्यामुळे हा मार्ग ज्या देशांमधून जाईल, त्या देशांवर नकारात्मक आर्थिक परिणाम होणार असून, त्यांची स्वायत्तता धोक्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

'चीनच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा अमेरिकेवरील प्रभाव' या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. वन बेल्ट वन रोड या प्रकल्पामधून चीनने अवलंबलेल्या विस्तारवादी धोरणामुळे  अमेरिकन संरक्षण विभाग चिंतित आहे, असे या लेखात म्हटले आहे. या रोडमध्ये सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात येणार आहे. अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे या लेखाक म्हटले आहे. 

गेल्या 24 तासांमधील चीनवर प्रसिद्ध झालेला पेंटागॉनचा हा दुसरा अहवाल आहे.''वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे अशीही गुंतवणूक होईल, ज्यामुळे चीनला लष्करी बळ मिळू शकेल. लॉजिस्टिक सपोर्टसाठी चीन परदेशी बंदरांपर्यंत आपला विस्तार करेल. तसेच हिंदी महासागर, भूमध्य समुद्र आणि पॅसिफिक महासागर येथे आपली लष्करी ताकद वाढवेल."
 

Web Title: China's One Belt One Road project news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.