China Rocket out of control: अवघ्या जगाने श्वास रोखला! चीनचे अनियंत्रित रॉकेट कोणत्याही क्षणी कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 08:50 AM2021-05-09T08:50:03+5:302021-05-09T08:53:25+5:30
China Rocket out of control: दुसरीकडे हे रॉकेट कुठे पडेल हे अद्याप सांगता येत नाहीय. एखाद्या शहरावर पडले तर त्याचा विध्वंस मोठा असणार आहे. चीनने म्हटले आहे की, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याला जाळण्यात येईल, यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाहीय.
कोरोनानंतर गेल्या आठवड्यात चीनने आणखी एका घटनेवरून अवघ्या जगाला हादरविले होते. एप्रिलमध्ये अंतराळात सोडलेले एक मोठे रॉकेट अंतराळात जाताच नियंत्रणाबाहेर (China Rocket out of control) गेले होते. हे रॉकेट 8 मे रोजी (अमेरिकन वेळ) पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार होते. आता हे रॉकेट आज काही तासांत पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. अमेरिकेने ही माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती. (The Long March 5B, the China's largest rocket, is expected to come down today, but where and when are difficult to predict.)
विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की
दुसरीकडे हे रॉकेट कुठे पडेल हे अद्याप सांगता येत नाहीय. एखाद्या शहरावर पडले तर त्याचा विध्वंस मोठा असणार आहे. चीनने म्हटले आहे की, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याला जाळण्यात येईल, यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाहीय.
काही मिनिटांपूर्वी चीनचे हे लाँगमार्च 5बी रॉकेट न्यू यॉर्क, माद्रिद आणि बिजिंगवरून पुढे सरकले आहे. शेवटचे हे रॉकेट चिली आणि न्यूझीलंडच्या आकाशात दिसले आहे. हे रॉकेट ९० मिनिटांमध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे. सेकंदाला 7 किमी असा प्रचंड वेग आहे. आज सायंकाळी 4 च्या सुमारास हे रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याचा अंदाज एअरोस्पेसने लावला आहे. जर हे रॉकेट निर्मनुष्य भागात कोसळले तर ते एखाद्या विमान अपघातासारखे असणार आहे.
चीनने गेल्याच आठवड्यात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य लाँगमार्च 5बी हे रॉकेट अंतराळात (China Rocket out of control) पाठविले होते. हे रॉकेट 29 एप्रिलला लाँच करण्यात आले होते. हे चीनचे सर्वात मोठे कॅरिअर रॉकेट आहे. गेल्या वेळी लाँच केलेल्या रॉकेटमुळे देखील धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या रॉकेटमधून बाहेर पडल्या होत्या. त्या पृथ्वीवर कोसळल्याने आयव्हरी कोस्टच्या इमारतींना नुकसान झाले होते. काही सळ्या या आकाशात जळाल्या होत्या. आजचे हे रॉकेट ज्या गतीने पुढे जात आहे ते पाहता ते न्यूयॉर्क आणि माद्रीद किंवा दक्षिणेकडे चिली किंवा न्यूझीलंडच्या बाजुने प्रवेश करू शकते. या रॉकेटचा मार्गच अनियंत्रित झाल्याने ते कधी, कुठे वळेल हे देखील सांगता येत नाहीय, असे तज्ज्ञ जोनाथन मेगडोबल यांनी सांगितले.