अमेरिकेची दादागिरी रोखण्यासाठी चीनने उतरवले शक्तीशाली J-20

By Admin | Published: March 10, 2017 02:00 PM2017-03-10T14:00:00+5:302017-03-10T14:29:12+5:30

अमेरिकेच्या तुल्यबळ लष्करी सामर्थ्य उभे करण्याचा प्रयत्न करणा-या चीनने पाचव्या पिढीचे J-20 लढाऊ विमान तैनात केले आहे.

China's powerful J-20 to prevent America's dadgiri | अमेरिकेची दादागिरी रोखण्यासाठी चीनने उतरवले शक्तीशाली J-20

अमेरिकेची दादागिरी रोखण्यासाठी चीनने उतरवले शक्तीशाली J-20

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 10 - अमेरिकेच्या तुल्यबळ लष्करी सामर्थ्य उभे करण्याचा प्रयत्न करणा-या चीनने पाचव्या पिढीचे J-20 लढाऊ विमान तैनात केले आहे. अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीनचा लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरु आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाला विशेष प्राधान्य दिले आहे. 
 
चीनचे सध्या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाबरोबर उपग्रह विरोधी क्षेपणास्त्रांवर काम सुरु आहे. मागच्यावर्षी नोव्हेंबरमहिन्यात हवाई शो मध्ये चीनने पहिल्यांदा जगाला J-20 विमानाची झलक दाखवली. पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांना रडार पकडू शकत नाही. रडारला चकवा देण्याची क्षमता या विमानांमध्ये असते. रडारवर दिसत नसल्यामुळे या विमानांचा नायनाट करणे एक आव्हान असते. 
 
अमेरिकेच्या F-22 रॅपटर, F-35 प्रमाणे J-20 विमानांमध्ये रडारला चकवण्याची क्षमता आहे का ? ते अजून स्पष्ट झालेले नाही. 2014 च्या एअर शो मध्ये चीनने  J-31 स्टेलथ फायटर विमान पहिल्यांदा जगासमोर आणले. अमेरिकेच्या F-35 विमानाला टक्कर देण्यासाठी चीन  J-31 विमानाची निर्मिती करत आहे. चीनने नौदलाच्या प्रगतीवरही तितकेच लक्ष दिले आहे. 

Web Title: China's powerful J-20 to prevent America's dadgiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.