‘अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारणार नाहीत’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 01:19 AM2020-11-24T01:19:50+5:302020-11-24T01:20:15+5:30
ॲडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अँड काँटेम्पररी चायना स्टडीजचे अधिष्ठाता झेंग योंगनियान यांनी म्हटले की, अमेरिका जी कठोर भूमिका घेणार आहे
बीजिंग : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत अमेरिकेसोबत आपले संबंध आपोआप सुधारले जातील या भ्रमातून चीनने बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, असे चीन सरकारच्या सल्लागाराने म्हटले.
ॲडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अँड काँटेम्पररी चायना स्टडीजचे अधिष्ठाता झेंग योंगनियान यांनी म्हटले की, अमेरिका जी कठोर भूमिका घेणार आहे त्यासाठी चीनने तयार राहिले पाहिजे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार योंगनियान म्हणाले, अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यासाठी चीन सरकारने प्रत्येक संधीचा उपयोग केला पाहिजे. चांगले जुने दिवस निघून गेले. अमेरिकेतील शीतयुद्धाचे बहिरी ससाणे अनेक वर्षे सक्रिय ठेवले गेले आणि एका रात्रीतून ते दिसेनासे होणार नाहीत, असे झेंग म्हणाले.