विमानांच्या घुसखोरीचे चीनने केले समर्थन

By admin | Published: June 6, 2017 04:41 AM2017-06-06T04:41:04+5:302017-06-06T04:41:04+5:30

चीनची हेलिकॉप्टर्स उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील बाराहोती भागात शनिवारी घिरट्या घालत होती.

China's support for aircraft infiltration | विमानांच्या घुसखोरीचे चीनने केले समर्थन

विमानांच्या घुसखोरीचे चीनने केले समर्थन

Next


बीजिंग : भारताच्या हद्दीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हेलिकॉप्टर्सनी केलेल्या प्रवेशाचे चीनने सोमवारी समर्थन केले. भारत आणि चीन यांच्यात पूर्वेकडील भागात सीमेचा वाद असून चीनचे लष्कर त्या संबंधित भागात नियमितपणे गस्ती घालत असते, असे चीनने म्हटले. चीनची हेलिकॉप्टर्स उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील बाराहोती भागात शनिवारी घिरट्या घालत होती. यावर्षी मार्चपासून चीनच्या हेलिकॉप्टर्सनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याची हा चौथी घटना आहे.
मोदींच्या वक्तव्याचे स्वागत
भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद तापलेला असला तरी गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडली गेलेली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्ये केलेल्या वक्तव्याचे चीनने सोमवारी स्वागत केले. मोदी यांच्या या सकारात्मक विधानाचे आम्ही स्वागत करतो, असे चीनने म्हटले आहे.
भारताला एनएसजीचे सदस्यत्व देणे गुंतागुंतीचे
अणु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळणे आणखी गुंतागुंतीचे बनले आहे तर भारतीय हवाई हद्दीत शिरलेल्या चीनच्या हेलिकॉप्टर्सचे चीनने समर्थन केले आहे. अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न करणाऱ्या देशांना एकच नियम लागू केला पाहिजे, अशी भूमिका घेऊन चीनने सोमवारी नव्या परिस्थितीत भारताच्या सदस्यत्वाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळली.

Web Title: China's support for aircraft infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.