संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 04:22 PM2017-11-06T16:22:34+5:302017-11-06T16:22:34+5:30

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे.

China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman | संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

googlenewsNext

बीजिंग - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण सज्जतेचा आढावा घेण्यासाठी रविवारी अरुणाचल प्रदेशमधील अंजा जिल्ह्याचा दौरा केला होता. 
 सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, "चीन आणि भारताच्या सीमेवरील पूर्वेकडील एका प्रदेशाबाबत विवाद सुरू आहे. या विवादित भागात भारताकडून करण्यात आलेला हा दौरा संबंधित भागातील शांततेसाठी प्रतिकूल आहे."
चर्चेद्वारे सीमाविदाद सोडवण्यासाठी भारतीय पक्षकारांनी चीनी पक्षकारांसोबत काम केले पाहिजे. भारत हा मुद्दा सोडवण्यासाठी चीनसोबत काम करेल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा स्वीकार्ह तोडगा निघेल आणि आमच्या चिंतेचे निराकरण होईल, अशी भूमिका भारताची असेल, असी अपेक्षा चीनच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली. 
 अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. 
दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात सिक्किममधील भारत आणि चीन सीमेजवळील. नथू ला भागाचा दौऱा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.   

मनिलामध्ये होणा-या पूर्व आशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार देश एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. हे चार देश एकत्र येत असल्याने चीन सध्या चिंतेमध्ये आहे. आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना झाली आहे. जवळपास दशकभरापासून या चार देशांमध्ये खंडीत झालेली चर्चा पुन्हा सुरु होणार आहे. येत्या 13 नोव्हेंबरला मनिलामध्ये पूर्व आशिया परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहू शकतात. 

या बैठकीमुळे कुठल्या तिस-या पक्षाच्या हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

Web Title: China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.