भारतासोबतच्या वाटाघाटीत चीनकडून बांगलादेशचा वापर?
By admin | Published: December 28, 2016 02:25 AM2016-12-28T02:25:26+5:302016-12-28T02:25:26+5:30
ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपावर भारताबरोबर होणाऱ्या वाटाघाटींमध्ये चीन भारताविरोधात बांगलादेशचा वापर करू शकेल, अशी शक्यता चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने वर्तविली
बीजिंग : ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपावर भारताबरोबर होणाऱ्या वाटाघाटींमध्ये चीन भारताविरोधात बांगलादेशचा वापर करू शकेल, अशी शक्यता चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने वर्तविली आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिबेट प्रांतातून भारताच्या उत्तर-पूर्वेत वाहते. चीनचा वन बेल्ट, वन रोड (किंवा सिल्क रोड कार्यक्रम) पुढे रेटण्यासाठी चीन ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या प्रश्न वापरू शकते.
सिल्क रोडच्या माध्यमातून चीन आणि उर्वरित युरोसियातील संपर्कावर भर आहे व हा कार्यक्रम काही भारताने उत्साहाने स्वीकारलेला नाही. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत कल्पना आणि संशयाचे वातावरण
निर्माण करण्यासाठी कम्युनिस्ट
पार्टी आॅफ चीनकडून ‘ग्लोबल टाइम्स’ या माध्यमाचा वारंवार वापर केला जातो.
‘ग्लोबल टाइम्स’मध्ये म्हटले आहे की, भारताला चीनसोबत धरणे बांधण्यासाठी व पाणी वाहण्याचा मार्ग, त्याचा दर्जा आदीची माहिती देवाण-घेवाण करण्याचा करार करायचा आहे हे समजण्यासारखे आहे, परंतु बांगलादेशलाही या पार्श्वभूमीवर आपले हित जपण्याचा हक्क
आहेच. (वृत्तसंस्था)