चीनची वर्ल्डक्लास आर्मी ठरणार भारतासह शेजारी देशांसाठी धोका? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 05:15 PM2017-11-01T17:15:16+5:302017-11-01T17:15:40+5:30

चीनच्या लष्कराला 2050 पर्यंत वर्ल्ड क्लास बनवण्याची घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली होती. चीनच्या या आक्रमक धोरणामुळे भारतासह चीनच्या अन्य शेजारील देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

China's WorldClass Army threatens neighboring countries including India? | चीनची वर्ल्डक्लास आर्मी ठरणार भारतासह शेजारी देशांसाठी धोका? 

चीनची वर्ल्डक्लास आर्मी ठरणार भारतासह शेजारी देशांसाठी धोका? 

Next

बीजिंग - चीनच्या लष्कराला 2050 पर्यंत वर्ल्ड क्लास बनवण्याची घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली होती. चीनच्या या आक्रमक धोरणामुळे भारतासह चीनच्या अन्य शेजारील देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र चीनच्या वाढल्या सैनिकी महत्त्वाकांक्षांमुळे सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. लढाऊ विमाने, जहाज, अत्याधुनिक हत्यारांची खरेदी आणि निर्मिती यामुळे चीनचे संरक्षण बजेट गेल्या 30 वर्षांमध्ये वेगाने वाढले आहे. मात्र चीनचा संरक्षणावरील खर्च अमेरिकेपेक्षा तीन पटीने कमी आहे. पण असे असले तरी चीनने अमेरिकेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. 
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मागच्या महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक काँग्रेसमध्ये साडेतीन तासांचे भाषण केले. यावेळी त्यांनी सन २०१२ मध्ये पक्ष व सरकारची धुरा स्वीकारल्यापासून केलेल्या कामाचा अहवाल सादर करतानाच शी जिनपिंग यांनी २०५० पर्यंत चीनला महान समाजवादी राष्ट्र बनविण्याचा संकल्पही जाहीर केला.बीजिंगमधील हे अधिवेशन जागतिक प्रसारमाध्यमांना खुले नव्हते. एकपक्षीय सत्ता असलेल्या चीनमध्ये पक्ष व सरकारप्रमुख म्हणून एकाच व्यक्तीकडे ठेवण्याची परंपरा आहे.  
युद्ध कसे जिंकता येईल त्यावर लक्ष द्या तसेच लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर (मॉर्डनायझेशन) भर देण्यास सांगितले. 2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प जिनपिंग यांनी यावेळी बोलून दाखवला. या बैठकीच्यावेळी शी जिनपिंग लष्करी गणवेशात होते. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना पक्षासोबत पूर्णपणे एकनिष्ठ रहाण्याचा आदेश दिला. 2035 पर्यंत चिनी लष्कराची मॉर्डनायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. 
भविष्यात चीन समोर अमेरिकेच्याबरोबरीने भारताचेही आव्हान असेल. दोन महिन्यांपूर्वी डोकलामच्या मुद्यावरुन चीन आणि भारताचे लष्कर समोरासमोर उभे होते. यावेळी चीनकडून दादागिरीचा भरपूर प्रयत्न झाला. सरकारी मालकीच्या वृत्तपत्रातून भारताला भरपूर धमक्या देण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारचाने ना युद्धाची भाषा केली, ना आपले सैन्य मागे घेतले. भारताच्या या खंबीर भूमिकेमुळे अखेर चीनला माघार घ्यावी लागली. भारताबरोबर आपल्याला युद्ध परवडू शकत नाही हे चीनच्या कळून चुकले आहे तसेच दक्षिण चीन समुद्रातही चीनसमोर अनेक देशांचे आव्हान आहे. त्यामुळे चीनने आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर जोर दिला आहे. 

Web Title: China's WorldClass Army threatens neighboring countries including India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन