China Coronavirus : 'हे' मिश्रण प्यायल्याने होते कोरोना वायरसचे निदान; ब्रिटिश नागरिकाने केला अनोखा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 05:36 PM2020-02-04T17:36:52+5:302020-02-04T17:39:07+5:30

Corona Virus : २ महिन्यांपूर्वी मला चीनमधील वुहान शहरामध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Chine coronavirus : Drinking 'this' mixture causes diagnosis of corona virus; Unique claim made by a Briton man | China Coronavirus : 'हे' मिश्रण प्यायल्याने होते कोरोना वायरसचे निदान; ब्रिटिश नागरिकाने केला अनोखा दावा

China Coronavirus : 'हे' मिश्रण प्यायल्याने होते कोरोना वायरसचे निदान; ब्रिटिश नागरिकाने केला अनोखा दावा

Next
ठळक मुद्देमधासोबत व्हिस्की प्यायला असा दावा कोनोरने केला.  खूप खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे कोनोरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ब्रिटिश नगराचे नाव कोनोर रीड (२५) असं आहे.

कोरोना वायरसची लागण झालेल्या एका ब्रिटिश नागरिकाने त्याने व्हिस्की आणि मध प्यायल्याने कोरोना वायरसपासून स्वतः चा जीव वाचवला असल्याचा अनोखा दावा केला आहे. या ब्रिटिश नगराचे नाव कोनोर रीड (२५) असं आहे.

China Coronavirus: कोरोना व्हायरसवर कॉकटेल लस; 48 तासांत सुधारणा होत असल्याचा दावा


शिक्षक असलेल्या कोनोरने युकेतील 'द सन' या प्रसारमाध्यमास माहिती देताना सांगितले की, मी मरणाच्या दारापर्यंत जाऊन परत आलो आहे. जेव्हा २ महिन्यांपूर्वी मला चीनमधील वुहान शहरामध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ३६० हून अधिक लोकांचा बळी या वायरसमुळे गेला होता. उपचारादरम्यान त्याने अँटीबायोटिक गोळ्या घेणं टाळलं आणि त्याऐवजी त्याने इन्हेलरचा वापर केला. तसेच मधासोबत व्हिस्की प्यायला असा दावा कोनोरने केला. 

China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग


जुन्या पद्धतीचा उपाय केला, मात्र ती युक्ती केल्यासारखे वाटले, असे कोनोरने युकेतील एका वृत्तपत्राला सांगितले. यासाठी मी पुरावा आहे कोरोना वायरसने माझा मृत्यू झाला असता. कोनोर हा गेल्या उन्हाळ्यात इंग्रजी शिकवण्यासाठी वुहानमध्ये गेला होता. खूप खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे कोनोरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २ आठवड्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. नंतर त्याला कोरोना वायरसचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती न्यू यॉर्क पोस्टने दिली आहे. 

Web Title: Chine coronavirus : Drinking 'this' mixture causes diagnosis of corona virus; Unique claim made by a Briton man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.