Flood in china : चीनमध्ये पुराचा कहर, 12 जणांचा मृत्यू, 100000 लोकांचे रेस्क्यू; शाओलिन मंदिरालाही पावसाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:10 AM2021-07-21T10:10:37+5:302021-07-21T10:13:18+5:30
सिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,00,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मुसळधार पाऊसामुळेचीनमध्ये किमान 12 जणांचा बळी गेला आहे. तर शेकडो लोक सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आणि सब-वे, शाळा आणि कार्यालयांतच अडकून पडले आहेत. पुरात अनेक गाड्याही वाहून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचेही समजते.
चीनमधील अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआने, हेनान हवामान खात्याचा हवाला देत म्हटले आहे, की हेनान प्रांतातील राजधानी झेंग्झौमध्ये मंगळवारी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास जवळपास 20 सेंटी मीटर (8 इंच) पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. सब-वे स्टेशन आणि कारमध्येही पूर्णपणे पाणी भरले होते. यामुळे अनेक गाड्याही वाहतांना दिसून आल्या. चीनमधील सोशल मिडियावर पुराचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
चीनने बनवली जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन; प्रतितास वेग पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
शाओलिन मंदिरही प्रभावित -
झेंग्झौच्या उत्तरेकडील प्रसिद्ध शाओलिन मंदिर बौद्ध भिक्खुच्या मार्शल आर्टसाठी ओळखले जाते. या मंदिरालाही पावसाचा तडाखा बसला आहे. हेनान प्रांतात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळं आहेत. तसेच हा प्रांत उद्योग आणि शेतीसाठीही ओळखला जातो.
1 लाख लोकांचे रेस्क्यू -
सिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,00,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, जे लोक पुरात अडकले आहेत, ते आपापल्या कार्यालयांत अथवा हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत.