इस्रायलमध्ये चिनी राजदूताचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला; जगभरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:31 PM2020-05-17T15:31:33+5:302020-05-17T15:33:59+5:30

इस्रायली यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू; मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

Chinese ambassador to Israel Du Wei found dead at home kkg | इस्रायलमध्ये चिनी राजदूताचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला; जगभरात एकच खळबळ

इस्रायलमध्ये चिनी राजदूताचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला; जगभरात एकच खळबळ

Next

जेरुसलेम: इस्रायलमध्येचीनच्या राजदूताचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चीनचे राजदूत डू वेई यांचा मृतदेह त्यांच्या हर्टजलियामधील निवासस्थानात सापडला. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे. 

इस्रायलमध्ये सरकारच्या शपथविधीच्या घडामोडींना वेग आला असताना राजदूत डू वेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. सध्या पोलिसांकडून वेई यांच्या घराची तपासणी सुरू आहे. चीनच्या दुतावासानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायलमधल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डू वेई यांच्या घरात हल्ल्याचे कोणतीही पुरावे आढळून आलेले नाहीत. वेई यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असावा, असा प्राथमिक अंदाज प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकातल्या काही अधिकाऱ्यांनी वर्तवला. मात्र अद्याप तरी वेई यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. 

५७ वर्षांच्या डू वेई यांचा मृतदेह त्यांच्या बेडवर आढळून आला. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वेई यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी इस्रायलमधील चीनचे दूत म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. 

इस्रायलमध्ये सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या घडामोडी सुरू असताना वेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं राजकीय बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर आज बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. ते पाचव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत. 

राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?

मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

Web Title: Chinese ambassador to Israel Du Wei found dead at home kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.