मोठी बातमी; मोदी सरकारचा चीनला दणका; दोन फेमस चिनी अ‍ॅप हटवण्याचे Play Store ला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:09 PM2020-08-04T17:09:39+5:302020-08-04T17:11:06+5:30

भारत-चीन सीमेवरील चिनी सैन्याच्या कुरापतीनंतर केंद्र सरकरानं चिनला एकामागून एक दणके देण्यास सुरुवात केली.

Chinese App Ban in India: Govt blocks Baidu Search, Weibo after TikTok; to be taken off from app stores | मोठी बातमी; मोदी सरकारचा चीनला दणका; दोन फेमस चिनी अ‍ॅप हटवण्याचे Play Store ला आदेश

मोठी बातमी; मोदी सरकारचा चीनला दणका; दोन फेमस चिनी अ‍ॅप हटवण्याचे Play Store ला आदेश

Next

भारत-चीन सीमेवरील चिनी सैन्याच्या कुरापतीनंतर केंद्र सरकरानं चिनला एकामागून एक दणके देण्यास सुरुवात केली. TikTok, UC Browser यांच्यानंतर केंद्र सरकारनं चीनच्या आणखी दोन अ‍ॅपवर भारतात बंदी घातली आहे. त्यामुळे आता या अ‍ॅपना प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरमधूनही हटवण्याचे आदेश दिले गेले आहेत. गूगल सर्च आणि ट्विटरला पर्याय म्हणून या अ‍ॅपचा देशात वापर केला जात होता. 

IPL2020 : BCCIची चिंता वाढली; Vivo आयपीएलसोबतचा करार मोडण्याची शक्यता

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं वीबो (Weibo) आणि बायडू (Baidu) या अ‍ॅपवर बंदी घातली आहे. चिनी अ‍ॅप वीबोला गूगल सर्च आणि बायडूला ट्विटरचा पर्याय म्हणून वापरले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार 27 जुलैला बंदी घातलेल्या 47 अ‍ॅप्समध्ये या दोन अ‍ॅपचा समावेश आहे. या दोन्ही अ‍ॅपला गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. (Centre has blocked Baidu Search and Weibo apps )

...तर 69 वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त व्हायला सांगाल का?; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सवाल

याशिवाय देशातील इंटरनेट सर्व्हीस पुरवठा करणाऱ्यांनाही या अ‍ॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार 2009मध्ये सीना कॉर्पोरेशनतर्फ वीबो अ‍ॅप लाँच करण्यात आले होते आणि जगभरात त्याचे 500 मिलियन नोंदणीकृत युजर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही वीबोवर एक अकाऊंट होते, परंतु भारत-चीन वादानंतर त्यांनी ते बंद केले.(Centre has blocked Baidu Search and Weibo apps )

बायडू का Facemoji की बोर्ड खूप प्रसिद्ध आहे आणि भारतात हा अ‍ॅप ‘Waters’ ची टेस्टिंग करत होता. या अ‍ॅपचा भारताता विस्तार वाढवण्यासाठी कंपनीचे सीईओ रॉबिन ली यांनी यावर्ष जानेवारी महिन्यात मद्रास येथील IITला भेट दिली होती. (Centre has blocked Baidu Search and Weibo apps )

29 जूनला केंद्र सरकारनं 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली  

केंद्र सरकारनं 29 जूनला 59 चीनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यात टिकटॉक, शेअरइट, किवी, यूसी ब्राऊझर, बायडू मॅप, शेइन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लायकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊझर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊझर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाइव्ह, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, माय व्हिडिओकॉल झिओमी,

वुई सिंक, ईएस फाईल एक्प्लोरर, ब्युटीप्लस, व्हिवा व्हिडिओ क्यूयू व्हिडिओ इंक, मीटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट हाईड, कॅचे क्लीनर डीयू अ‍ॅप स्टुडिओ,डीयू क्लीनर, डीयू ब्राऊझर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेन्डस, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर चिताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बैदू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर, यू व्हिडिओ, व्ही प्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड््स आणि डीयू प्रायव्हसी.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मॅट फिशरच्या 'यॉर्कर'समोर फलंदाजानं घातलं लोटांगण; पाहा भन्नाट व्हिडीओ

MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

देशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र!

Read in English

Web Title: Chinese App Ban in India: Govt blocks Baidu Search, Weibo after TikTok; to be taken off from app stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.