चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:13 AM2023-06-30T07:13:48+5:302023-06-30T07:14:15+5:30
Education: मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही.
बीजिंग : ‘मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही. नुकतेच त्यांनी विद्यापीठात प्रवेशासाठी असणारी परीक्षा तब्बल २७ व्यांदा दिली आणि ते नापास झाले. त्यामुळे पदवी मिळवणे त्यांचे स्वप्नच राहते की काय अशी स्थिती आहे.
चीनच्या पोलादी पडद्याआड चालणाऱ्या बऱ्याच गोष्टी जगापुढे येत नाहीत; पण एवढे मात्र नक्की या देशात पदवीधर होणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. गावोकाओ विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी एक अतिशय कठीण परीक्षा आहे.
लियांग शी यांचा त्याग
लियांगची कहाणी चीनमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी एका सामान्य चिनी व्यक्तीच्या संघर्षाची आहे; पण त्यांच्या जिद्दीची बात काही औरच. प्रसिद्धीच्या हेतूनेच ते ही स्टंटबाजी करतात, असे माध्यमांमध्ये बोलले जाते; पण ते हा आरोप फेटाळून लावतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जे सामान्य विद्यार्थी करतो, ते सर्व ते करतात. पैसाअडका असूनही त्यांना अनेक दिवस मौजमजेपासून दूर राहून अभ्यास करावा लागतो.
परीक्षेचा असाही माहौल...
nचीनमध्ये दरवर्षी दोन दिवस रस्त्यावर शांतता असते. या दिवशी चीनमधील एक कोटीहून अधिक शाळकरी मुले ‘गाओकाओ’ परीक्षा देतात.
nइथे चीनच्या शिक्षणपद्धतीत कोणाला विद्यापीठात प्रवेश मिळेल आणि कोणाला नाही, हे ठरवले जाते. गाओकाओ म्हणजे उच्चशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा.
एवढा अटापिटा कशासाठी? : लिआंग शी विद्यापीठात प्रवेशासाठी इतका अटापिटा का करत असतील, असा प्रश्न पडतो. त्यांचे उद्दिष्ट एवढेच आहे की, लोकांनी आपल्याला बुद्धिजीवी म्हणून ओळखावे. या एकाच इच्छेपोटी ते २७ वर्षांपासून ही परीक्षा क्रॅक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कारखान्यात छोट्याशा नोकरीपासून सुरुवात केली. त्यांचा स्वतःचा बांधकाम साहित्य निर्मितीचा व्यवसाय आहे. यातून ते लाखो युआन कमवत आहेत, हा भाग वेगळा.