धक्कादायक! चिनी जोडप्यानं रचला ‘देशांतर्गत देश बनवण्याचा कट’, अमेरिकेपर्यंत बसले हादरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:32 PM2022-09-15T12:32:01+5:302022-09-15T12:32:43+5:30

Chinese Couple plotted to set up own country: मार्शल आयलँड्समध्ये मिनी स्टेट बनवण्याचा कट रचलेल्या या जोडप्याला 2020 मध्ये थायलँड (Thailand) मधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना गेल्या आठवड्यांतच अमेरिकेत नेण्यात आले आहे.

Chinese couple plan to set up their own micro country on Marshall islands tension increase in us | धक्कादायक! चिनी जोडप्यानं रचला ‘देशांतर्गत देश बनवण्याचा कट’, अमेरिकेपर्यंत बसले हादरे

धक्कादायक! चिनी जोडप्यानं रचला ‘देशांतर्गत देश बनवण्याचा कट’, अमेरिकेपर्यंत बसले हादरे

googlenewsNext

अनेक लोकांचा आपल्या शेजाऱ्यांच्याच जमिनीवर डोळा असतो. काही राजकीय नेते दुसऱ्या देशाच्या जमिनी हडपण्याचाही विचार करत असतात. या मोहिमेत चीन (China) सर्वाधिक अॅक्टिव्ह दिसतो. यातच, चीनच्या एका जोडप्याने आपला स्वतःचाच देश बनविण्याचा कट रचला होता. यामुळे थेट अमेरिकेपर्यंत (US) याचे हादरे बसले आहेत. जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण...

देशामध्येच स्वतःचा एक देश! -
'बीबीसी'ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, 50 वर्षीय कॅरी यान आणि 34 वर्षीय जिना झोऊ यांनी मार्शल बेटावर (Marshall Islands) एक मिनी स्टेट तयार करण्याचा कट रचला होता. यासाठी या दोघांनी साम-दाम-दंड भेद, अशा प्रत्येक गोष्टीचा वापर केला. मात्र, त्यांच्या या धूर्ततेचा भांडाफोड झाला.

अमेरिकन खासदारांना देण्यात आली लाच - 
या जोडप्याने आपले काम कढून घेण्यासाठी खासदार आणि अधिकाऱ्यांना लाच दिली, असे या फसवणुकीबाबतच्या खटल्याशी संबंधित अमेरिकन वकिलांचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, मार्शल आयलँड्स म्हणजे, हवाई आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान पसरलेल्या अनेक बेटांची एक श्रृंखला आहे. आधी हा संपूर्ण भू-भाग अमेरिकेच्या (US) आधिपत्याखाली होता. ज्याला 1979 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते.

या चिनी पती-पत्नीने मार्शल बेटांवरील एका दुर्गम बेटावर अर्ध-स्वायत्त प्रदेश स्थापन करण्यासाठी तेथील खासदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

सरकारी उत्तराची प्रतीक्षा -
या प्रकरणाचा आवाज अगदी अमेरिकन काँग्रेसचे खासदार आणि न्याय विभागापर्यंत पोहोचला आहे. तेव्हा, हे घुसखोरीचे रॅकेट आणि हा कारनामा जगासमोर आला. मार्शल आयलंड्स सरकारने या आरोपांवर अद्याप कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. मात्र, अमेरिकेतील विरोधी पक्ष यासंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.

थायलंडमधून करण्यात आली अटक -
मार्शल आयलँड्समध्ये मिनी स्टेट बनवण्याचा कट रचलेल्या या जोडप्याला 2020 मध्ये थायलँड (Thailand) मधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना गेल्या आठवड्यांतच अमेरिकेत नेण्यात आले आहे.

 

Web Title: Chinese couple plan to set up their own micro country on Marshall islands tension increase in us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.