बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला; 13 जणांचा मृत्यू, बीएलएने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 04:59 PM2023-08-13T16:59:59+5:302023-08-13T17:00:35+5:30

सरकारी अधिकाऱ्यांनीही ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

Chinese engineers' convoy attacked in Pakistan's Balochistan, 2 terrorists killed | बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला; 13 जणांचा मृत्यू, बीएलएने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला; 13 जणांचा मृत्यू, बीएलएने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथील ग्वादरमध्ये झालेल्या हल्ल्यात चार चिनी नागरिकांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या नऊ जवानांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील ग्वादरमध्ये चिनी कामगारांवर झालेल्या आजच्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या आत्मघाती संघटना मजीद ब्रिगेडने स्वीकारली आहे. बीएलएचे म्हणणे आहे की, त्यांच्या दोन मजीद ब्रिगेड 'फिदाईन'ने हल्ल्यात भाग घेतला होता.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दोन कथित हल्लेखोरांची छायाचित्रे जारी केली आहेत. रुग्णालय आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या हल्ल्यात १३ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंदर शहर ग्वादरमध्ये स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर येथील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हा हल्ला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर करण्यात आला.

दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांनीही ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्वादरच्या फकीर कॉलनीजवळ चिनी अभियंत्यांवर हल्ला करण्यात आला. चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच आहे. बंदर चारही बाजूंनी वेढलेले आहे. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील चिनी वाणिज्य दूतावासांनी बलुचिस्तान आणि सिंधमधील आपल्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Chinese engineers' convoy attacked in Pakistan's Balochistan, 2 terrorists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.