धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:14 PM2021-08-03T16:14:38+5:302021-08-03T16:34:29+5:30

'द सन'च्या रिपोर्टनुसार, चीनी परिवार एका स्पॉटवर नैसर्गिक नजारा बघण्यासाठी पोहोचला, त्यांची कार अचानक खोल दरीकडे जाऊ लागली.

Chinese family car suddenly rolled down the valley on xinjiang duku highway | धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार...

धक्कादायक दृश्य! कारमध्ये बसून आराम करत होती फॅमिली, अचानक दरीत पडली कार...

googlenewsNext

चीनमध्ये एका परिवारासाठी बाहेर फिरायला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. सुदैवाने कारमधील परिवार वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. पण कारमध्ये समोर बसलेली एक महिला बाहेर येऊ शकली नाही आणि ती गंभीर जखमी झाली. ही घटना शिंजियांगच्या डुकू हायवेवर झाली.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, चीनी परिवार एका स्पॉटवर नैसर्गिक नजारा बघण्यासाठी पोहोचला, त्यांची कार अचानक खोल दरीकडे जाऊ लागली. ड्रायव्हर कारमधून उतरला होता. जेव्हा त्याला कार खोल दरीकडे जाताना दिसली तो जोरात ओरडला. तेव्हा मागच्या सीटवर बसलेला एक मुलगा आणि एक महिला वेळीच बाहेर पडले. मात्र, समोरच्या सीटवर बसलेली महिला सीट बेल्ट काढून बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे ती कारसोबतच खाली पडली. त्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमली.

हेजिंग काउंटी इमरजन्सी मॅनेजमेंट ब्यूरोनुसार कारमध्ये अडकलेली महिला जिवंत आहे. पण तिला गंभीर जखमा झाल्या आहेत. पण हे सध्या समजू शकलेलं नाही की, कारच्या हॅंडब्रेकमध्ये काही बिघाड होता का?

धक्कादायक बाब म्हणजे चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना केसेस वाढत आहेत. अशात लाखो लोकांना पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. बीजिंगसहीत अनेक मुख्य शहरांमध्ये कोविड टेस्ट केल्या. ज्या शहरांमध्ये कोविड पॉझिटिव्ह केस सापडल्या. त्यांच्यासोबत रेल्वे, बस, फ्लाइटचा संपर्क बंद केला आहे. पर्यटनावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. अशात लोक टुरिस्ट स्पॉटवर कसे पोहोचत आहेत हा प्रश्न आहे.
 

Web Title: Chinese family car suddenly rolled down the valley on xinjiang duku highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.