आता पाकिस्तानने आपला समुद्र चीनला 'विकला', ड्रॅगनची 20 जहाजे मासेमारीसाठी पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 10:52 AM2020-09-04T10:52:44+5:302020-09-04T10:53:34+5:30
दुसरीकडे पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर कराचीमध्ये इम्रान सरकार आणि चीनविरोधात जोरदार निषेध सुरू झाला आहे.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीननंपाकिस्तानमध्येच आपली वसाहत तयार केली आहे. पाकिस्तानने आता आपला समुद्र ड्रॅगनच्या स्वाधीन केला आहे. पाकिस्तानने आता चिनी जहाजांना आपल्या विशेष आर्थिक विभागात मासे पकडण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर कराचीमध्ये इम्रान सरकार आणि चीनविरोधात जोरदार निषेध सुरू झाला आहे.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे कराचीतील लोक संकटात सापडले आहेत आणि हजारो मच्छिमार चीनला विरोध करीत आहेत. पाकिस्तान सरकारच्या परवानगीनंतर खोल समुद्रात मासेमारी करण्यास सक्षम 20 ट्रॉलर्स चीनहून कराची येथे दाखल झाले आहेत. या चिनी जहाजांना सिंध आणि बलुचिस्तानच्या किनारपट्टीवर मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तानी मच्छिमारांना त्यांच्या भागात मासे पकडण्यासाठी चिनी जहाजे नको आहेत.
या पाकिस्तानी मच्छिमारांचे म्हणणे आहे की, चिनी जहाजं मोठ्या प्रमाणात मासे पकडू शकतात, ज्यामुळे नंतर समुद्री यंत्रणा बिघडेल आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागेल. पाकिस्तान फिशर फोक फोरमच्या अहवालानुसार किनारपट्टी भागात माशांची संख्या आधीच 72 टक्क्यांनी खाली आली आहे, याला कारण वन्य मासेमारी आहे.
मासेमारीवर अडीच लाख लोक जगतात
पाकिस्तानी मच्छिमारांना भीती वाटते आहे की, चिनी जहाजांमुळे मासेमारी करणे आणखी कठीण होईल. पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात मासेमारी करून अडीच लाख लोक आपले आयुष्य जगतात. हे मच्छीमार लहान बोटी वापरतात आणि खोल समुद्रात जाऊ शकत नाहीत. चिनी जहाजे हे करू शकतात आणि त्यांच्याकडे प्रचंड जाळी आहे, ज्याद्वारे ते मोठ्या प्रमाणात मासे पकडू शकतात. इक्वाडोर असो वा ऑस्ट्रेलियन किनारा असो, चीनची जहाजे सर्वत्र मासेमारी करण्यात सक्षम आहेत. जगातील एक तृतीयांश मांसाहार हा चीनमध्ये केला जाते. त्यामुळे चिनी किनारपट्टीवर मासे जवळजवळ नष्ट झाले आहेत आणि आता चिनी जहाजांना जगाच्या इतर भागात मासे पकडण्याची इच्छा आहे. याचा शोध घेताना आता चिनी जहाजे अरबी समुद्रापर्यंत पोहोचली आहेत.