बापरे...ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:12 PM2023-01-09T13:12:59+5:302023-01-09T13:15:01+5:30

परिस्थितीत चीन मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश मंत्री आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Chinese location tracker in British government car; Fear of surveillance on ministers, officials | बापरे...ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती

बापरे...ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती

googlenewsNext

लंडन :  ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटिश मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मुत्सद्दी या कारचा वापर करत असत. ज्या कारच्या भागात हा ट्रॅकर सापडला तो चीनमधून आयात करण्यात आला होता. अशा परिस्थितीत चीन मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश मंत्री आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘ब्रिटनला चीनच्या धोक्याबद्दल आणखी किती पुरावे पाहिजेत? आता चीनला धोका म्हणून पाहण्याची वेळ आली आहे,’ असा इशारा ब्रिटनचे वरिष्ठ खासदार इयान डंकन स्मिथ यांनी दिला आहे. चिनी दुतावासाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हेरगिरीच्या संशयानंतर सरकारी वाहनाचा प्रत्येक भाग वेगळा करण्यात आला. अगदी लहान नट आणि बोल्टदेखील तपासले गेले.

Web Title: Chinese location tracker in British government car; Fear of surveillance on ministers, officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.