बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:06 PM2020-08-30T13:06:08+5:302020-08-30T13:17:42+5:30
चीनच्या जिआंग्सु प्रांतात ही घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाच्या डोक्यात 17 वर्षांपासून किडा जिवंत होता.
पेइचिंग - चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात 5 इंचाचा किडा असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनाही या घटनेने धक्का बसला असून सर्वच जण हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या जिआंग्सु प्रांतात ही घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाच्या डोक्यात 17 वर्षांपासून किडा जिवंत होता.
शरीरातील काही भागांचं सेंन्सेशन गेल्यानंतर तातडीने त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी पहिल्यांदा त्यालाला कच्च किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाल्ल्यामुळे अशा पद्धतीचं इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं. आई-वडिलांनी तरुणाला लहानपणापासून असा त्रास होत असल्याचं सांगितलं. मात्र सिटीस्कॅननंतर धक्कादायक बाब समोर आली आणि डॉक्टरही हैराण झाले.
डॉक्टरांना तरुणाच्या डोक्यात 5 इंचाचा किडा असल्याचं दिसून आलं. Sparganosi Mansoni असं या आजाराचं नाव असून हा एक दूर्मिळ आजार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हे इन्फेकेशन नेमकं कशामुळे झालं याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. ऑपरेशन करून हा किडा काढण्यात यश आले आहे. या किड्याने तरुणाच्या शरीरावर परिणाम झाला होता. मात्र ऑपरेशन नंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लॉकडाऊनमध्ये लागली लॉटरी! https://t.co/BCCtL97s1z#Mumbai
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2020
ही कसली आई? दोन मुलींची केली हत्या अन्...https://t.co/sm2kKOL6eC#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र
माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या
सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान
'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान