चिनी मीडियानं मोदींवर उधळली स्तुतिसुमनं, आर्थिक सुधारणांची केली तारीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 03:56 PM2019-05-14T15:56:06+5:302019-05-14T15:56:20+5:30
चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत.
बीजिंग- चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. भारतापेक्षा आम्ही खूप पुढे निघून गेलो आहोत. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीचं अंतर फार वाढलं आहेत. चीनची अर्थव्यवस्था 13.6 ट्रिलियनची झाली आहे, तर भारत आतापर्यंत फक्त 2.8 ट्रिलियनच्या जवळपास आहे. त्यामुळे भारतालाही वृद्धीदर वाढवावा लागणार आहे, असंही मतही चीनच्या वृत्तपत्रातून व्यक्त करण्यात आलं आहे. मोदींनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि काही सेक्टर्समध्ये होत असलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी असल्याचं चीननं म्हटलं आहे.
खरं तर भारताचा जीडीपी गेल्या पाच वर्षांत 6.7 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. परंतु सांख्यिकी कारणास्तव आकड्यांवर परिणाम होतोय. सरकारनं जीडीपी मोजण्याचं तंत्र आणि आधार वर्ष बदलल्यानंही वृद्धीदरावर प्रभाव पडला आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलाच्या किमती पडल्या आहेत. भारत दरवर्षी यावर बऱ्यापैकी पैसे खर्च करतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या चढ-उतारही भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. भारतीय अर्थव्यवस्थेला ग्लोबल ऊर्जेच्या किमतीतही फायदा पोहोचला आहे.
मोदींनी आर्थिक सुधारणांमध्ये केलेल्या प्रगतीवर ग्लोबल टाइम्सच्या लेखातून स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. नोटाबंदी, कर सुधारणासारख्या गोष्टी अचानक करण्यात आल्यानं सामान्यांना थोडासा धक्का बसला होता. त्याचा नकारात्मक परिणामही जाणवला, पण ते स्वाभाविक असल्याचंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.