चीनची दडपशाही, १० लाख तिबेटी मुलांना कुटुंबापासून वेगळे केले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 07:15 AM2023-02-09T07:15:53+5:302023-02-09T07:17:13+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये, तिबेटी मुलांसाठी निवासी शाळा मोठ्या प्रमाणात अनिवार्य करण्यात आल्याने चिंतेची परिस्थिती आहे.
संयुक्त राष्ट्रे : चीनमधील अल्पसंख्याक तिबेटी समुदायातील दहा लाख मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले गेले असून, त्यांना सरकारी निवासी शाळांत ठेवण्यात आले आहे. चीन सरकारच्या या धोरणाचा हेतू तिबेटमधील लोकांना सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिकदृष्ट्या हान संस्कृतीत बळजबरीने सामावून घेण्याचा आहे, असा आरोप करीत संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र मानवाधिकार तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांमध्ये, तिबेटी मुलांसाठी निवासी शाळा मोठ्या प्रमाणात अनिवार्य करण्यात आल्याने चिंतेची परिस्थिती आहे. तिबेटींना बहुसंख्य हान संस्कृतीत पूर्णपणे सामावून घेण्याचा यामागे हेतू आहे.