Chinese Rocket Landing: चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर भारतीय समुद्रात कोसळले; जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:26 AM2021-05-09T09:26:08+5:302021-05-09T09:36:07+5:30

China's out of control Rocket fall in Hindi Mahasagar: गेल्या आठवड्यात चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती. चीनने म्हटले होते की, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याला जाळण्यात येईल, यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाहीय. 

Chinese Rocket Landing: China's uncontrolled rocket finally crashed into the Indian Ocean | Chinese Rocket Landing: चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर भारतीय समुद्रात कोसळले; जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला

Chinese Rocket Landing: चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर भारतीय समुद्रात कोसळले; जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला

Next

कोरोना नंतर गेल्या आठवड्यात चीनने आणखी एका घटनेवरून अवघ्या जगाला हादरविले होते. एप्रिलमध्ये अंतराळात सोडलेले एक मोठे रॉकेट अंतराळात जाताच नियंत्रणाबाहेर (China Rocket out of control) गेले होते. हे रॉकेट 8 मे रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार होते. काही वेळापूर्वीच हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (An out-of-control Chinese rocket has finally fallen to Earth over the Indian Ocean, according to organisations who had been tracking it.)

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की


गेल्या आठवड्यात चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती. चीनने म्हटले होते की, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याला जाळण्यात येईल, यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाहीय. 



काही वेळापूर्वी चीनचे हे लाँगमार्च 5बी रॉकेट (Long March 5B Yao-2 disintegrates over Indian Ocean) न्यू यॉर्क, माद्रिद आणि बिजिंगवरून पुढे सरकले होते. शेवटचे हे रॉकेट चिली आणि न्यूझीलंडच्या आकाशात दिसले होते.  हे रॉकेट ९० मिनिटांमध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घालत होते. सेकंदाला 7 किमी असा प्रचंड वेग होता. आज सायंकाळी 4 च्या सुमारास (अमेरिकन वेळ) हे रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याचा अंदाज एअरोस्पेसने वर्तविला होता. 

 
चिनी माध्यमांनुसार हे रॉकेट भारताच्या दक्षिणपूर्व आणि श्रीलंकेच्या आजुबाजुला कुठेतरी कोसळले आहे. अमेरिकेच्या स्पेस फोर्सनुसार हे रॉकेट 18 हजार मैल प्रतितासाच्या वेगाने पृथ्वीकडे येत होते. सध्यातरी याच्या कोसळण्यामुळे काय नुकसान झाले आहे याची माहिती मिळालेली नाही. तरीदेखील समुद्रात कोसळल्याने कोणतीही हाणी झालेली नसण्याची शक्यता आहे. 


चीनने गेल्याच आठवड्यात  स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य लाँगमार्च 5बी हे रॉकेट अंतराळात (China Rocket out of control) पाठविले होते. हे रॉकेट 29 एप्रिलला लाँच करण्यात आले होते. हे चीनचे सर्वात मोठे कॅरिअर रॉकेट आहे. गेल्या वेळी लाँच केलेल्या रॉकेटमुळे देखील धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या रॉकेटमधून बाहेर पडल्या होत्या. त्या पृथ्वीवर कोसळल्याने आयव्हरी कोस्टच्या इमारतींना नुकसान झाले होते. काही सळ्या या आकाशात जळाल्या होत्या.  (Remnants of China's biggest rocket landed in the Indian Ocean, with the bulk of its components destroyed upon re-entry into the Earth's atmosphere: Reuters)

Web Title: Chinese Rocket Landing: China's uncontrolled rocket finally crashed into the Indian Ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन