चीनची कबुली! भारतात TikTok अॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 09:47 AM2020-07-02T09:47:31+5:302020-07-02T09:52:32+5:30
मूळची चिनी कंपनी असलेली टिकटॉक बंद झाल्यानं अब्जावधी डॉलरचं नुकसान होणार असल्याचं चीननं आता मान्य केलं आहे.
बीजिंग- लडाखच्या सीमेवर भारत अन् चीनमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली, त्याच पार्श्वभूमीवर चीनला धक्का देण्यासाठी मोदी सरकारनं चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली. मोदी सरकारच्या या कारवाईनंतर चीन चांगलाच कावराबावरा झाला आहे. या निर्णयानंतर तो सातत्यानं भारताला धमक्या देत सुटला आहे. भारताच्या चिनी अॅप्स बंद करण्याच्या निर्णयानं आमच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं चीन सांगत आहे. पण मूळची चिनी कंपनी असलेली टिकटॉक बंद झाल्यानं अब्जावधी डॉलरचं नुकसान होणार असल्याचं चीननं आता मान्य केलं आहे.
६ अब्ज डॉलर्सचे होऊ शकते नुकसान
चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने एक ट्विट केलं आहे. लडाखमधील संघर्षानंतर मोदी सरकारनं चीनच्या ५९ ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे टिकटॉकची पॅरंट कंपनी ByteDanceला ६ अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकते. एक ऍप बॅन केल्यामुळे चीनला जर एवढं नुकसान होत असेल, तर ५९ ऍपवर बंदी घातल्यानंतर चीनला किती नुकसान सोसावं लागलं याची कल्पनाही न केलेली बरी. ५९ ऍपवर बंदी घातल्यामुळे चीनला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
भारत चीनसाठी एक मोठी बाजारपेठ
ग्लोबल टाइम्स भारताच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतात चिनी उत्पादनांवर बंदी घातल्यानं चीनच्या नव्हे तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. चिनी कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, ज्यावर गेल्या तीन वर्षांपासून आमची नजर आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनला नुकसान होईल, अशी कबुलीही ग्लोबल टाइम्सनं दिली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या प्रतिकूल कृतीचा परिणाम चीनच्या कंपन्यांवरही होणार आहे.
म्हणूनच चीनला भारत बंदीची भीती वाटते
डिजिटल अर्थव्यवस्था पाहणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, जगातील इतर देशदेखील भारताच्या पावलावर पाऊल ठेवू शकतात, अशी भीती आता चिनी कंपन्यांना सतावते आहे. गूगल आणि फेसबुक या अमेरिकन कंपन्यांव्यतिरिक्त भारत आणि दक्षिण पूर्व आशियामधील काही देशांमध्ये चिनी कंपन्या दिवसेंदिवस यशोशिखर गाठत आहेत. चीन विकसित देश झाल्यानंतर या कंपन्यांनी दुसऱ्या देशात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे.
टिकटॉकचा होता अवाढव्य पसारा
एका अंदाजानुसार, वर्ष 2019मध्ये भारतात टॉप 200 अॅप्सपैकी 38 टक्के ऍप्स चीनमधील आहेत. चिनी अॅप्स भारतात विकसित झालेल्या ऍपच्या तुलनेत फक्त 41 मागे होते. वर्ष 2018 मध्ये चिनी अॅप्स भारतात पुढे होते. वर्ष 2019 मध्ये भारतीय लोकांनी टिकटॉकवर 5.5 अब्ज तास घालवले. 2018च्या तुलनेत हे 5 पट जास्त आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्ससाठी जमेची बाजू होती, जी लवकरच आयपीओ सुरू करणार होती. बाइटडान्समध्ये हॅलो अॅप देखील आहे, जो जगातील सर्वात मूल्यवान स्टार्टअप( 100 अब्ज डॉलर) आहे.
हेही वाचा
कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा
बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना
डोळे विस्फारतील! पांढऱ्या वटवाघळांना पाहून लोक म्हणाले, हे तर कापसाचे गोळे?
TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...
CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…
आजचे राशीभविष्य - 2 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव मिळेल