"कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 04:16 PM2023-10-25T16:16:35+5:302023-10-25T16:17:01+5:30

चिनी शास्त्रज्ञ आधीच भविष्यातील महामारींवर संशोधन करत आहेत.

chinese scientists discover eight new viruses and warn they could infect humans | "कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

"कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

जगभरातील अनेक देशांनी कोरोनासारख्या महाभयंकर संकटांचा सामना केला आहे. मात्र, तरीही अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता याच दरम्यान चिनी शास्त्रज्ञांनीही एक धक्कादायक खुलासा केला आहे. चिनी शास्त्रज्ञांच्या एका टीमने 8 नवीन खतरनाक व्हायरस शोधल्याचं म्हटलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, त्याचा संसर्ग माणसांमध्ये वेगाने पसरू शकतो, ज्यामुळे जगात आणखी एक साथीची शक्यता वाढली आहे.

मिररच्या रिपोर्टनुसार, चिनी शास्त्रज्ञ आधीच भविष्यातील महामारींवर संशोधन करत आहेत. यासाठी त्यांनी चीनच्या हॅनान बेटावरील उंदरांचे 700 नमुने घेतले. त्यांच्या संशोधनादरम्यान, त्यांना आठ नवीन व्हायरस आढळले, त्यापैकी एक कोरोना व्हायरस सारख्या व्हायरसजन्य कुटुंबातील होता. हे संशोधन चायना असोसिएशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित विरोलोगिका सिनिका या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जर्नलचे संपादक डॉ. शी झेंगली आहेत.

मेल ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, या अभ्यासात 2017 ते 2021 या चार वर्षांच्या कालावधीत बेटावर पकडलेल्या विविध उंदरांमधून घेतलेल्या 682 स्वॅबचा समावेश होता, असं म्हटलं आहे. त्यानंतर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. विश्लेषणाने अनेक नवीन आणि कधीही न पाहिलेले व्हायरस उघड झालं. यापैकी एक नवीन कोरोना व्हायरस उदयास आला, ज्याला शास्त्रज्ञांनी CoV-HMU-1 असं नाव दिलं आहे.

कोरोना व्हायरस हे चिंतेचे एकमेव कारण नव्हतं. इतर व्हायरसमध्ये येलो फिव्हर आणि डेंग्यूशी संबंधित दोन नवीन पेस्टीव्हायरसचा समावेश आहे. शास्त्रज्ञांना एक एस्टोव्हायरस देखील आढळला, ज्यामुळे पोटातील जंत सारखे संक्रमण होते, पारवो व्हायरस, ज्यामुळे फ्लू होतो आणि इतर दोन पेपिलोमाव्हायरस होते, ज्यामुळे कॅन्सर होतो. संशोधकांनी असा सिद्धांत मांडला की, जगाच्या कमी लोकसंख्येच्या कोपऱ्यात आणखी बरेच अज्ञात व्हायरस लपलेले असण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: chinese scientists discover eight new viruses and warn they could infect humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन