पाच दशकांनंतर भारतातून घरी परतला चिनी सैनिक

By admin | Published: February 12, 2017 12:23 AM2017-02-12T00:23:57+5:302017-02-12T00:23:57+5:30

१९६२ च्या युद्धात सीमा ओलांडल्यामुळे ५० हून अधिक वर्ष भारतात अडकलेला चीनी सैनिक भारतीय कुटुंबातील सदस्यांसह शनिवारी मायभूमीत परतला. वांग क्वी (७७)

Chinese soldiers returned home from India after five decades | पाच दशकांनंतर भारतातून घरी परतला चिनी सैनिक

पाच दशकांनंतर भारतातून घरी परतला चिनी सैनिक

Next

बीजिंग : १९६२ च्या युद्धात सीमा ओलांडल्यामुळे ५० हून अधिक वर्ष भारतात अडकलेला चीनी सैनिक भारतीय कुटुंबातील सदस्यांसह शनिवारी मायभूमीत परतला. वांग क्वी (७७) असे या सैनिकाचे नाव आहे. पाच दशकांपूर्वी ताटातुट झालेल्या चीनी आप्तेष्टांची पुन्हा भेट झाली तेव्हा ते भावूक झाले.
वांग यांच्यासोबत मुलगा विष्णू वांग, सून नेहा आणि नात खनक वांग यांच्यासह येथे आले आहेत. मात्र, त्यांच्या भारतीय पत्नी सुशीला भारतातच थांबल्या. वांग व त्यांच्या मुलांना त्यांच्या गावी नेण्यात येईल.
चीनला भेट देता यावी म्हणून वांग यांना २०१३ मध्ये पासपोर्ट देण्यात आला, असे चीनी परराष्ट्र मंत्रालयाने ६ फेब्रुवारी रोजी सांगितले. चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनी अलीकडेच वांग यांच्याशी चर्चा केली होती. वांग एका रात्री अंधारात रस्ता चुकल्यामुळे ते पूर्वेकडील भागातून भारतात आले. आसाममध्ये आल्यानंतर भारतीय रेड क्रॉसने १ जानेवारी १९६३ रोजी त्यांना भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले होते. (वृत्तसंस्था)

युद्धानंतरची घटना
भारत आणि चीनधील युद्धानंतर वांग रस्ता चुकून भारतात आले. १९६९ मध्ये कारागृहातून सुटका झाल्यानंतर मध्यप्रदेशच्या बालघाट जिल्ह्यातील गावात ते स्थायिक झाले. बीबीसीने हे वृत्त देताच चीनी सोशल मीडियात त्यास व्यापक प्रसिद्धी मिळाली आणि चीन सरकारने त्यांच्या वापसीचे प्रयत्न सुरू केले.

Web Title: Chinese soldiers returned home from India after five decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.