चिनी पाणबुडी, युद्धनौैका श्रीलंकेत
By admin | Published: November 4, 2014 02:13 AM2014-11-04T02:13:21+5:302014-11-04T02:13:21+5:30
श्रीलंके ने चिनी पाणबुडी व युद्धनौका, कोलंबो बंदरावर तैनात करण्यास परवानगी दिली आहे. चीन श्रीलंकेत आपले अस्तित्व वाढवत असून, भारताने यासंदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेकडे दुर्लक्ष
कोलंबो : श्रीलंके ने चिनी पाणबुडी व युद्धनौका, कोलंबो बंदरावर तैनात करण्यास परवानगी दिली आहे. चीन श्रीलंकेत आपले अस्तित्व वाढवत असून, भारताने यासंदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
चीनची पाणबुडी शांगझेंग २ व लढाऊ नौका शिंग दाओ कोलंबो बंदरात शुक्रवारी आले, सात आठवड्यांपूर्वी चिनी पाणबुडीने दीर्घकाळ कोलंबो बंदरात गस्त घातली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दक्षिण आशिया दौऱ्याआधी पुन्हा चीनने या दोन नौका कोलंबो बंदरात तैनात केल्या आहेत. चीनची पाणबुडी व लढाऊ नौका ३१ आॅक्टोबरपासून कोलंबो बंदरावर असून पुढचे पाच दिवस इंधन भरणे व खलाशांना आराम देण्यासाठी येथे राहणार आहेत, असे श्रीलंका आरमाराच्या प्रवक्त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)