परदेशात वा‘ात वर्तन करणारे चिनी पर्यटक काळ्या यादीत

By Admin | Published: April 13, 2015 11:53 PM2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

बीजिंग- परदेशात वाह्यात वर्तन करणार्‍या चिनी पर्यटकांची नावे काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चिनी पर्यटकांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत. चीनचे राष्ट्रीय पर्यटन महामंडळ परदेशात गुन्हे करणार्‍या पर्यटकांची नावे पोलीस, कस्टम अधिकारी व बँकांकडेही पाठविली जाणार आहेत.

Chinese tourists who behave abroad in black list | परदेशात वा‘ात वर्तन करणारे चिनी पर्यटक काळ्या यादीत

परदेशात वा‘ात वर्तन करणारे चिनी पर्यटक काळ्या यादीत

googlenewsNext
जिंग- परदेशात वाह्यात वर्तन करणार्‍या चिनी पर्यटकांची नावे काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चिनी पर्यटकांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत. चीनचे राष्ट्रीय पर्यटन महामंडळ परदेशात गुन्हे करणार्‍या पर्यटकांची नावे पोलीस, कस्टम अधिकारी व बँकांकडेही पाठविली जाणार आहेत.
या पर्यटकांच्या गैरवर्तनामुळे देशाची प्रतिमा खराब होते. हे पर्यटक देशात व परदेशात सार्वजनिक वाहतुकीत अडथळे आणतात, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात, स्थानिक परंपरांचा अनादर करतात, ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचे नुकसान करतात, तसेच जुगार व अश्लीलता यांचा आधार घेतात. अशा लोकांना घटना घडल्यापासून दोन वर्षे काळ्या यादीत टाकले जाईल.
गेल्या काही दशकांत चिनी अर्थव्यवस्था भरभराटीला आली. त्यामुळे मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळू लागला. चिनी पर्यटकांनी गेल्या वर्षी हाँगकाँग, मकाऊ व तैवानला जाण्यासाठी १०० दशलक्ष येन खर्च केले. पण पैसा खर्च करुन परदेशी सहलीवर जाणारे हे पर्यटक परदेशात गुण उधळत असल्याने चिनी अधिकार्‍यांना तोंड लपवावे लागले.
यातूनच पर्यटकांच्या गैरवर्तनाला वेसण घालण्यासाठी काळ्या यादीचा हा उपाय चीन सरकारने योजला आहे. चिनी पर्यटकांनी थायलंडमध्ये विमानतळावर अंतर्वस्त्रे वाळत घातल्याची घटना अलीकडेच घडली आहे. मंदिरातील घंटा वाजवणे, विमानाचे आणीबाणीचे दार उघडणे, खलाशांवर गरम नूडल्स फेकणे अशा अपमानजनक घटना परदेशात घडल्या असून, त्यामुळे चीन सरकार अडचणीत आले आहे.

Web Title: Chinese tourists who behave abroad in black list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.