MADE IN CHINA! कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 09:23 AM2020-09-12T09:23:32+5:302020-09-12T09:23:46+5:30

चीनमधला हा मानवनिर्मित व्हायरस असल्याचा आपण म्हणू शकतो, असे सांगत त्यांनी चिनी सरकारवर ठपका ठेवला. माझ्याकडे याचा पुरावा आहे आणि मी ते सिद्ध करेन.

chinese virologist li meng yan claiming beijing covered up covid19 | MADE IN CHINA! कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

MADE IN CHINA! कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

Next

चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा सातत्यानं आरोप केला जात आहे. या धोकादायक विषाणूच्या उत्पत्तीबद्दल अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देश चीनला दूषणं लावत आहेत. आता चिनी सरकारच्या धमकीनंतरही स्वत: अमेरिकत येणार्‍या चिनी महिला विषाणुशास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे. व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, जे ती लवकरच सादर करणार आहे. चीनने या विषाणूबद्दल बरेच काही लपवून ठेवले आहे आणि चीनमधला हा मानवनिर्मित व्हायरस असल्याचा आपण म्हणू शकतो, असे सांगत त्यांनी चिनी सरकारवर ठपका ठेवला. माझ्याकडे याचा पुरावा आहे आणि मी ते सिद्ध करेन.

ली-मेंग म्हणाल्या, कोरोना वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही, कारण मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे, तर व्हायरस निसर्गाची निर्मिती नाही. जर हा विषाणू वुहानच्या मांस बाजारातून आला नाही, तर मग त्याचा कसा उद्भव झाला. यावर उत्तर देताना ली मेंग म्हणाल्या की, हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला आहे आणि तो मानवनिर्मित आहे. या विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे आणि त्याच्या आधारे हे सिद्ध होते की हा मानवनिर्मित व्हायरस आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की, तो मनुष्याने उत्पन्न केलेला आहे.

ली मेंग म्हणतात, जरी आपल्याकडे जीवशास्त्रचे ज्ञान नाही किंवा आपण ते वाचत नाही, तरीही आपण व्हायरसचे मूळ त्याच्या आकाराद्वारे ओळखण्यास सक्षम आहोत. या दरम्यान त्यांनी चिनी सरकारवर गंभीर आरोप केला की, या धमकीनंतर मी हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत स्थलांतरित झाले, पण माझी सर्व वैयक्तिक माहिती सरकारी डेटाबेसमधून मिटविली गेली आणि माझ्या सहका-यांना माझ्याबद्दल अफवा पसरविण्यास सांगण्यात आले.

ली मेंग म्हणाल्या की, सरकार मला खोटं पाडण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहे आणि माझ्यावर ठार मारण्याचादेखील आरोप ठेवला आहे, परंतु मी माझ्या ध्येयातून मागे हटणार नाही. कोरोना विषाणूचा अभ्यास करणार्‍या पहिल्या काही वैज्ञानिकांपैकी त्या एक आहेत. डिसेंबर 2019च्या उत्तरार्धात त्यांनी असा दावा केला होता की, विद्यापीठातील त्यांच्या पर्यवेक्षकाद्वारे चीनमध्ये उद्भवलेल्या एसएआरएससारख्या विषयावरील विकृतींचा शोध घेण्यास सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, मी प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे आणि हा विषाणू मानवनिर्मित आहे हे लवकरच सिद्ध करेन.
 

Web Title: chinese virologist li meng yan claiming beijing covered up covid19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन