‘चिनी लढाऊ विमाने एफ-35 च्या तोडीची नाहीत’
By admin | Published: December 13, 2014 02:44 AM2014-12-13T02:44:06+5:302014-12-13T02:44:06+5:30
चीनने अलीकडेच विकसित केलेले जे 31 हे विमान शत्रूच्या तावडीतून निसटण्यास सक्षम असले तरीही अमेरिकेच्या एफ-35 या लढाऊ विमानाशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही अशी कबुली चीनने दिली आहे.
Next
बिजिंग : चीनने अलीकडेच विकसित केलेले जे 31 हे विमान शत्रूच्या तावडीतून निसटण्यास सक्षम असले तरीही अमेरिकेच्या एफ-35 या लढाऊ विमानाशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही अशी कबुली चीनने दिली आहे.
अमेरिकेच्या विमानासारखी विमाने तयार करणो हे आपले लक्ष्य होते. पण त्यात यश मिळाले नाही असे चीनने म्हटले आहे. जे 31 चे निर्माता व अॅव्हिएशन इंडस्ट्री कार्पोरेशन ऑफ चायना (एव्हीआयसी) चे अध्यक्ष लिन जूमिंग यांनी सीसीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली आहे. आकाशात उडत असताना विरोधी विमानाला मागे टाकणो जे 31 ला शक्य होणार नाही असे जूमिंग यांनी म्हटले आहे. जे 31 हे लढाऊ विमान झुहाई शहरात भरलेल्या विमान प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. चिनी प्रसारमाध्यमात या विमानाचा मोठा गवगवा करण्यात आला आहे. (वृत्त्तसंस्था)
पाकिस्तानने ही विमाने आपल्या हवाई दलात समाविष्ट करणार असल्याचेही जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)