सोशल मीडियावर पुरूष बनून 12 वर्ष आपल्या मैत्रिणीला फसवत राहिली महिला, कोट्यावधी रूपये लाटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 11:33 AM2022-12-17T11:33:12+5:302022-12-17T11:35:55+5:30
China : एक महिला तिच्याच मैत्रिणीसोबत 12 वर्षांपासून खोटं बोलत होती आणि तिच्याकडून पैसे घेत होती.
China Crime News : मित्र म्हटले की, ते आपल्या मित्रांची टिंगल, गंमत करणारच. मैत्रीत एकमेकांना त्रास देणं, गंमत करणं हे आलंच. पण जेव्हा गंमत सीमा पार करते तेव्हा किंवा दगा दिला जातो तेव्हा त्याला मैत्री म्हणता येणार नाही. एका चीनी महिलेने मैत्रीच्या नात्याला बदनाम केल्याची घटना समोर आली आहे. एक महिला तिच्याच मैत्रिणीसोबत 12 वर्षांपासून खोटं बोलत होती आणि तिच्याकडून पैसे घेत होती.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शांघायच्या पोलिसांनी नुकताच दावा केला की, त्यांनी एक फारच विचित्र ऑनलाइन स्कॅम केस सॉल्व केली आहे. केस सॉल्व करताना पोलिसांनी एका चीनी महिलेला अटक केली आहे. या केसमध्ये जी पीडित महिला आहे ती मध्यम वयातील आहे आणि गेल्या 12 वर्षांपासून एक व्यक्ती तिला ऑनलाईन फसवत होती.
रिपोर्टनुसार, महिला सोशल मीडियावर 12 वर्षांपासून एका व्यक्तीसोबत चॅट करत होती. तो टीव्ही न्यूज अॅंकर असल्याचं सांगत होता. इतकंच नाही तर त्याने प्रेमाचं नाटक केलं आणि यादरम्यान महिलेकडून 2 कोटी रूपये हडपले. या फसवणुकीचं कारण होती पीडित महिलेची आई.
झालं असं की, यू आणि ली नावाच्या महिला दोघीही खास मैत्रिणी होत्या. एक दिवस ली ची आई तिला आणि तिच्या मैत्रिणीला म्हणाली की, दोघीही सुंदर नाहीत. त्यामुळे दोघींना पती शोधण्यासाठी अडचण येईल. मैत्रिणीच्या आईने असं म्हटल्यावर तिला राग आला आणि तिने विचार केला की, ती हे दाखवून देईल की, ती पती शोधू शकते.
तिने ली आणि तिच्या आईला सांगितलं की, तिचा एक मित्र आहे जो न्यूज अॅंकर आहे आणि चांगल्या मुलीच्या शोधात आहे. आई म्हणाली की, ती तिच्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत ठरवेल. त्यानंतर यू ने फेक अकाउंट तयार केलं आणि ली सोबत बोलणं सुरू केलं. बरीच वर्ष दोघे बोलत राहिले आणि जेव्हा तिने ली चा विश्वास मिळवला. तेव्हापासून यू ने ली कडे पैसे मागण्यास सुरूवात केली. तिने न्यूज अॅंकर बनून ली कडून पैसे मागण्यास सुरूवात केली. तिने ली कडून 2 कोटी रूपये घेतले. ली भेटण्याचं बोलत होती तर काहीतरी कारण सांगत ती टाळत होती.
जेव्हा ली कडे पैसे संपले आणि न्यूज अॅंकरने भेटण्यास नकार दिला तेव्हा तिने यू सोबत याबाबत चर्चा केली. ती म्हणाली की, तिला न्यूज अॅंकरसोबत भेट करून दे. कारण तिला तो चुकीचा माणूस वाटतोय. त्याने तिच्याकडून पैसे घेतले आणि आता तिला पैसे परत हवे आहेत. यानंतर यू ने ली ला सगळं सत्य सांगितलं आणि तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. ली ने नंतर पोलिसात तक्रार दिली.