पाकमध्ये ख्रिश्चन नागरिक रस्त्यावर
By admin | Published: March 16, 2015 11:45 PM2015-03-16T23:45:34+5:302015-03-16T23:45:34+5:30
पाकिस्तानातील अनेक शहरांत सोमवारी ख्रिश्चन नागरिक रस्त्यावर उतरले. तालिबान दहशतवाद्यांनी लाहोर शहरातील दोन चर्चवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १५ भाविक ठार झाले होते.
इस्लामाबाद : चर्चवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांत सोमवारी ख्रिश्चन नागरिक रस्त्यावर उतरले. तालिबान दहशतवाद्यांनी लाहोर शहरातील दोन चर्चवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १५ भाविक ठार झाले होते. रविवारच्या विशेष प्रार्थनेदरम्यान हा हल्ला करण्यात आला. योहानाबाद भागातील रोमन कॅथॉलिक चर्च व ख्राईस्ट चर्चला लक्ष्य केले होते.
मृतांच्या दफनविधीच्या दृृष्टीने देशातील ख्रिश्चन शाळा बंद ठेवण्यात येतील, असे समुदायाचे नेते व जहाजमंत्री कामरान मायकेल यांनी सांगितले. हल्ल्यानंतर संतप्त ख्रिश्चन नागरिकांनी हल्लेखोरांशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोन जणांना ठार मारून त्यांचे मृतदेह जाळले होते.