पेशावरमध्ये ख्रिश्चन कॉलनीवर हल्ला, मर्दानमध्ये बॉम्बस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2016 09:59 AM2016-09-02T09:59:43+5:302016-09-02T12:02:18+5:30
पाकिस्तानातील मर्दान शहरातील जिल्हा कोर्टाबाहेर शुक्रवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. २ - पाकिस्तानातील मर्दान शहरातील जिल्हा कोर्टाबाहेर शुक्रवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ६ जण ठार झाले असून, ४० जण जखमी झाले आहेत. आधी छोटा स्फोट झाला त्यानंतर मोठा स्फोट झाला.
त्यापूर्वी पाकिस्तानात पेशावरमधील ख्रिश्चन कॉलनीवर हल्ला झाला. तालिबानशी संबंधित जमात उर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानातील पेशावर शहरातील ख्रिश्चन कॉलनीवर शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. एका नागरीकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला असून एकूण पाच जण ठार झाल्याची माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
सकाळी सहाच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये चकमक सुरु झाली. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ ही ख्रिश्चन कॉलनी आहे. या भागात स्फोटाचे आवाज ऐकू आले असून, पाकिस्तानी सैन्य दलांकडून या भागात शोध मोहिम सुरु आहे. सध्या या भागाला सुरक्षापथकांनी घेराव घातला आहे.