ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट यांचे निधन, ५ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 08:32 AM2023-01-01T08:32:18+5:302023-01-01T08:33:00+5:30
पोप बेनडिक्ट यांनी २०१३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
कॅथलिक ईसाई म्हणजेच ख्रिश्चन समाजाचे सर्वाच मोठे धर्मगुरू राहिलेले पोप बेनडिक्ट १६ वे यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी शनिवारी सकाळी ९.३४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती, वेटिकनचे स्पोक्सपर्सन माटेओ ब्रूनी यांनी पोप यांच्या निधनाचे अधिकृत वृत्त दिले. २ जानेवारी २०२३ रोजी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सेंट पीटर बेसिलिका येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर, ५ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पोप बेनडिक्ट यांनी २०१३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शारिरीक प्रकृती बिघडल्याचे कारण देत बेनडिक्ट यांनी यांनी राजीनामा दिला. सीएनएन मीडिया रिपोर्टनुसार बेनडिक्ट यांच्याअगोदर १४१५ मध्ये पोप ग्रेगरी १२ वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, तब्बल ६०० वर्षांच्या इतिहासात पोप पदाचा राजीनामा देणारे बेनडिक्ट हे पहिले पोप ठरले आहेत.
२८ डिसेंबर रोजी पोप फ्रांसिस यांनी सांगितले होते की, पोप बेनडिक्ट यांची तब्येत अधिकच बिघडली आहे. त्यावेळी, पोप बेनडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही पोप फ्रान्सिस यांनी केले होते.