इजिप्तमध्ये ख्रिश्चनांच्या बसवर हल्ला
By Admin | Published: May 26, 2017 04:39 PM2017-05-26T16:39:56+5:302017-05-26T16:39:56+5:30
मध्य इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन्सच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
ऑनलाइन लोकमत
इजिप्त, दि. 26- मध्य इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन्सच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. दक्षिण काहिरापासून 250 किमीवर असणाऱ्या मिन्या प्रांतांत ही घटना घडली आहे. कॉप्टिक ख्रिश्चन असलेली बस चर्चमध्ये जात असताना ही घटना घडली आहे. खरंतर या महिन्यामध्ये आधीसुद्धा कॉप्टिकवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत.
इजिप्तमध्ये 9 एप्रिल रोजी आयसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला होता तर 119 जण जखमी झाले होतेय. तांता आणि अलेक्झँड्रिया या दोन शहरातील दोन चर्चमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले होते. कैरोपासून 120 किलोमीटर दूर तांता शहरातील स्फोटात 27 जणांचा मृत्यू झाला होता तर अलेक्झँड्रियामध्ये झालेल्या हल्ल्यात 18 जणांना प्राण गमवावे लागले होते. तांतामधील चर्चमध्ये स्फोटक ठेवून वस्तू स्फोट घडवण्यात आला. तांतामधील हल्ल्यानंतर अलेक्झांड्रीयाच्या मनशियातील सेंट माकर्स कॅथेड्रलमध्ये आत्मघाती हल्ला घडवला होता. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.