केनियात मुस्लिमांच्या मदतीमुळे वाचले ख्रिश्चनांचे प्राण
By Admin | Published: December 24, 2015 12:28 PM2015-12-24T12:28:49+5:302015-12-24T12:39:06+5:30
केनियामध्ये एका प्रवासा दरम्यान मुस्लिमांनी ख्रिश्चन नागरीकांचे दहशतवाद्यांपासून प्राण वाचवल्याची चांगली घटना घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
मंडेरा, दि. २४ - मागच्या महिन्यात पॅरिसवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये मुस्लिमधर्मीयांबद्दल असंतोषाची भावना वाढत असताना, केनियामध्ये एका प्रवासा दरम्यान मुस्लिमांनी ख्रिश्चन नागरीकांचे दहशतवाद्यांपासून प्राण वाचवल्याची चांगली घटना घडली आहे.
बीबीसीने दिलल्या वृत्तानुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रवाशांनी भरलेली बस मंडेरामधून जात असताना अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी ही बस रोखली. बसमध्ये आल्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मीयांची हत्या करण्यासाठी दोन्ही प्रवाशांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण बसमधील मुस्लिमांनी वेगळे होण्यास नकार दिला.
सोडायचे असेल तर सर्वांना सोडा किंवा सर्वांनाच मारा असे दहशतवाद्यांना ठणकावून सांगितले. अखेर त्या दहशतवाद्यांनी सर्वांना जाऊ दिले. यावेळी ख्रिश्चनांचे प्राण वाचवण्यासाठी बसमधल्या मुस्लिम प्रवाशांनी त्यांना आपला पोषाखही देऊ केला होता. या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी होते. प्रवाशांनी एवढी एकजूट दाखवूनही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तिघेजण जखमी झाले.