न्यूटनच्या हस्तलिखित लेखांचा होणार लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:17 AM2021-06-02T10:17:20+5:302021-06-02T10:17:56+5:30
लिलावकर्ते क्रिस्टीजने सांगितले की, न्यूटन याने स्वतच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या पानांवर प्रिन्सिपियावर केलेल्या आपल्या काऱ्याचे विवेचन केले आहे.
लंडन : महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन याच्या हस्तलिखित लेखांचा लंडनमध्ये लवकरच लिलाव होणार आहे. न्यूटनच्या डोक्यात त्यावेळी कोणते विचार होते, हे या लेखांतून समजते.
लिलावकर्ते क्रिस्टीजने सांगितले की, न्यूटन याने स्वतच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या पानांवर प्रिन्सिपियावर केलेल्या आपल्या काऱ्याचे विवेचन केले आहे. प्रिन्सिपिया किंवा फिलॉसॉफी नॅच्युरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (प्राकृतिक दर्शनाचे गणितीय सिद्धांत) यामध्ये गुरुत्वाकर्षण व गतीच्या सिद्धांतांचे वर्णन आहे.
१६८७ मध्ये छापलेले याबाबतचे पुस्तक लॅटिन भाषेत आहे. ते तीन भाषांमध्ये विभाजित आहे. यात न्यूटनच्या गतीचे नियम, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम व केप्लरच्या ग्रहीय गतीच्या नियमांची उत्पत्ती सांगितलेली आहे. प्रिन्सिपियाला विज्ञानाच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण पुस्तक मानले जाते.
पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा लिलाव २०१६मध्ये ३७ लाख डॉलरच्या किमतीत झाला होता.
लंडनच्या क्रिस्टीजमध्ये पुस्तके व हस्तलिखित दस्तावेजांचे प्रमुख थॉमस वेनिंग यांनी सांगितले की, हे पुस्तक ब्रह्मांडाबाबत आमच्या आकलनाला नवीन आधार देईल.
लेखाच्या अर्ध्या भागातून याची दुसरी आवृत्ती काढण्याची योजना आहे. यात स्कॉटलँडचे गणितज्ज्ञ व खगोल शास्त्रज्ञ डेव्हिड ग्रेगरीच्या टिप्पणी व आकृत्यांचा समावेश आहे. न्यूटन १६९०च्या दशकात प्रिन्सिपियावर काम करीत होते, तेव्हा त्याची या दोन शास्त्रज्ञांशी भेट झाली होती.