अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:22 AM2018-09-18T09:22:22+5:302018-09-18T09:24:25+5:30
मेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये एका भागात सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा केला जात आहे.
ओहयो : जगभरात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नाताळ धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र, अमेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये एका भागात सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा केला जात आहे. कारण आहे, एका मुलाला मेंदुचा कर्करोग झाल्याचे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा केवळ 2 महिनेच जिवंत राहू शकणार आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांनी तीन महिने आधीच नाताळ साजरा करण्यात सुरुवात केली. याला शेजाऱ्यांनीही प्रतिसाद देत नाताळ साजरा करत आहेत.
मुलाला खुश करण्यासाठी त्याच्या पालकांनी नाताळ सप्टेंबरमध्येच साजरा करण्याचा निर्णय घेतला. नाताळच्या तयारीसाठी त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. या आवाहनाला त्यांच्या आसपासच्या उपनगरातील लोकांनी प्रतिसाद दिला. यानंतर सर्वत्र नाताळसारखीच विद्युत रोषणाई, मिठाई वाटण्यात आली. 23 सप्टेंबरला या भागात नाताळ परेड काढण्यात येणार आहे. या बालकाचवरील उपचारही बंद करण्यात आले आहेत.