अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 05:06 AM2017-03-19T05:06:07+5:302017-03-19T06:27:44+5:30
अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.
Next
>ऑनलाइन लोकमत
मिसौरी, दि. 19 - अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. स्थानिकवेळेनुसार शनिवारी दुपारच्या सुमारास सेंट चार्ल्स काउंटी येथे चक बेरी यांचे निधन झाल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली.
गायक आणि प्रसिद्ध गिटारवादक म्हणून चक बेरी यांची ओळख होती. त्यांनी सात दशकांच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये रोल ओव्हर बिथोवन आणि जॉन बी गुड अशा अनेक गाण्याचा यामध्ये समावेश आहे. 1955 मध्ये त्यांचे मेबेलिन पहिले गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला सुद्धा सर्वाधिक जास्त पसंती मिळाली होती.
चक बेरी यांना 1984 साली संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणा-या ग्रॅमी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याचबरोबर संगीत क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यांच्या जन्म मिसौरीमधील सेंट लुईमध्ये 1926 मध्ये झाला होता.