काम न करणारे श्वानही सीआयएने बसवले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:04 AM2017-10-23T05:04:14+5:302017-10-23T05:04:56+5:30

अमेरिकेची गुप्तहेर संघटना सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला (सीआयए) लुलु या लॅब्रॉडोर जातीच्या कुत्रीकडून मोठ्या आशा होत्या की, ती आपली बाँब शोधण्याच्या कामाला चांगली उपयोगी पडेल, परंतु तसे घडले नाही व तिला तिची ही नोकरी गमवावी लागली.

The CIA did not even work for the home | काम न करणारे श्वानही सीआयएने बसवले घरी

काम न करणारे श्वानही सीआयएने बसवले घरी

Next

वॉशिंग्टन- काही लोक कामाचा अती ताण सहन करू शकत नाहीत, ही परिस्थिती कुत्र्यांनाही लागू पडते. अमेरिकेची गुप्तहेर संघटना सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला (सीआयए) लुलु या लॅब्रॉडोर जातीच्या कुत्रीकडून मोठ्या आशा होत्या की, ती आपली बाँब शोधण्याच्या कामाला चांगली उपयोगी पडेल, परंतु तसे घडले नाही व तिला तिची ही नोकरी गमवावी लागली.
लुलुची सुरुवात चांगली झाली, परंतु ती लवकरच निरुपयोगी ठरू लागली, असे सीआयएच्या ‘पपडेट’ नावाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. तिचे प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांतच लुलुमध्ये बाँब व स्फोटके शोधण्यात काही गोडी नाही, अशी लक्षणे दिसू लागली. तिच्या प्रशिक्षकांनी तिला स्फोटकांचा शोध घेण्यासाठी खायला घालून किंवा खेळायला लावून प्रोत्साहनही दिले असते, परंतु तिने काहीच गोडी दाखविली नाही.
च्बाँब व स्फोटके शोधणाºया कुत्र्यांची मानसिक व शारीरिक अवस्था उत्तम असणे, ही सीआयएसाठी प्राधान्याची बाब असते. त्यामुळे सीआयएने कमालीचा अवघड निर्णय घेतला, तो म्हणजे लुलुला सेवेतून दूर करण्याचा. अर्थात, हा निर्णय लुलुच्याही हिताचाच होता. लुलुसारख्या श्वानांना सीआयएने वगळत असली तरी त्यांना तीच संस्था दुसरे काम देते. लुलुला सध्या नवे घर मिळाले आहे.
च्ती बागेत ससे आणि खारींना पकडण्याचे काम करीत आहे. अर्थात हे काम काही तिला ताण निर्माण करणारे नाही. लुलुला बाँब शोधण्याचे आव्हान स्वीकारण्यात गोडी नव्हती की कामावर जायची वेळच येऊ नये यासाठी तिने खेळलेला हा डाव होता हे स्पष्ट झालेले नाही. ते काहीही असले तरी लुलु आणि तिचा प्रशिक्षक आनंदी आहे.

Web Title: The CIA did not even work for the home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.