सीआयएचे हॅकिंग युनिट करू शकले नाही स्वत:च्याच माहितीचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:32 PM2020-06-17T23:32:45+5:302020-06-17T23:33:08+5:30

इतिहासातील सर्वांत मोठी सायबर चोरी

CIA unit that crafts hacking tools didnt protect itself | सीआयएचे हॅकिंग युनिट करू शकले नाही स्वत:च्याच माहितीचा बचाव

सीआयएचे हॅकिंग युनिट करू शकले नाही स्वत:च्याच माहितीचा बचाव

Next

वॉशिंग्टन : हॅकिंगच्या अत्याधुनिक पद्धती व सायबर शस्त्रे विकसित करणारी अमेरिकेतील गुप्तचर संस्था आपल्याच एका युनिटचे संरक्षण करण्यास अपयशी ठरली. गुप्त माहिती चोरी होत असताना त्यांना खबरही लागली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

गुप्तचर संस्थेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी डेटा चोरी असून, त्याबाबत एक अंतर्गत अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, आपली सुरक्षा प्रणाली मजबूत करण्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, हे सर्व उणिवांमुळे आपल्या समोर आले आहे. सायबर सुरक्षेबाबतही यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सिनेट गुप्तचर समितीचे वरिष्ठ सदस्य व सिनेटर रॉन वाईडन यांनी न्याय विभागाकडून हा सुधारित अहवाल प्राप्त केला आहे. यापूर्वी हा अहवाल यावर्षी सीआयएच्या हॅकिंग पद्धतीच्या चोरीसंबंधात पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यांनी मंगळवारी एका पत्रासह हा अहवाल जारी केला आहे. त्यांनी गुप्तचर संस्थेचे संचालक जॉन रेटक्लिफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संघीय गुप्तचर संस्थेकडे देशाची जी गुप्त माहिती आहे, तिच्या सुरक्षेसाठी काय केले जात आहे?

२०१७ च्या अहवालात सीआयएने विरोधकांचे नेटवर्क हॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आधुनिक माध्यमांची चोरीचा तपास करण्यासंबंधी माहिती होती. येथील एका वृत्तपत्राने हा अहवाल सर्वप्रथम प्रकाशित केला होता.

विकिलिक्सने सीआयएच्या विशेष सायबर गुप्तचर केंद्रातून तयार केलेल्या हॅकिंगच्या पद्धती प्राप्त केल्या आहेत. यापैकी ३५ पद्धतींबाबत विकिलिक्सने तपशीलवार माहिती जारी केली होती, असे २०१७ च्या अहवालात म्हटले आहे. २०१६ मध्ये झालेली ही इतिहासातील सर्वांत मोठी चोरी होती, असे मानले जात आहे. १८० गिगाबाईटपासून ३४ टेराबाईटची माहिती चोरी करण्यात आली होती. विकिलिक्सने एक वर्षानंतर ही माहिती उघड केल्यावरच गुप्तचर संस्थेला याबाबत कळाले. या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून सीआयएच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरकडे पाहिले जात आहे.

Web Title: CIA unit that crafts hacking tools didnt protect itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.