‘सीआयए’चे गोपनीय अस्त्र ‘लिक’

By admin | Published: March 8, 2017 02:17 AM2017-03-08T02:17:03+5:302017-03-08T02:17:03+5:30

विकीलिक्सतर्फे नवीन धमाका करण्यात आला असून सेन्ट्रल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी, सीआयएच्या सायबर हॅकिंग टुल्सची माहिती उघड करण्यात आली आहे.

CIA's secret weapon 'Lick' | ‘सीआयए’चे गोपनीय अस्त्र ‘लिक’

‘सीआयए’चे गोपनीय अस्त्र ‘लिक’

Next
>ऑनलाइन लोकमत
आईसलँड, दि. 08 - विकीलिक्सतर्फे नवीन धमाका करण्यात आला असून सेन्ट्रल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी, सीआयएच्या सायबर हॅकिंग टुल्सची माहिती उघड करण्यात आली आहे. 
भारतीय वेळ मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही माहिती ‘वॉल्ट ७’ या नावाने जाहीर झाली आहे. सुमारे ८७६१ दस्ताऐवजाद्वारे भाग पहिला प्रसिद्ध करण्यात आला असून सायबर हॅकिंगसाठी सीआयए काय काय कसे वापरते याचा ऊहापोह आहे. सायबर हॅकिंगमध्ये, अ‍ॅन्ड्रॉईड, आयओएस, ओएसएक्स व लिनेक्स आॅपरेटींग सिस्टीम्स हॅक करण्याची माहिती आहे. ब्रिटनच्या ‘एमआय ५’ एजन्सीच्या सहकार्याने सॅमसंग टीव्ही हॅक करण्यात येत होता. पाहिजे त्या टीव्हीचा माइक सुरु करुन सीआयएतर्फे त्या खोलीतील संभाषण ऐकण्यात येत होते हे विशेष. या रहस्यद्घाटनची सीआयएतर्फे कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही.

Web Title: CIA's secret weapon 'Lick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.