रशियात सिगारेटवर बंदी

By admin | Published: January 13, 2017 12:50 AM2017-01-13T00:50:09+5:302017-01-13T00:50:09+5:30

रशियात २०१५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे

Cigarette ban in Russia | रशियात सिगारेटवर बंदी

रशियात सिगारेटवर बंदी

Next

मॉस्को : रशियात २०१५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे तेथील सरकारने ठरवले आहे. तसा निर्णय आरोग्य मंत्रालय घेणार आहे. म्हणजेच २0१५ नंतर जन्मलेली व्यक्ती १८ वर्षांची झाल्यानंतरही त्याला रशियात सिगारेट मिळू शकणार नाही. या निर्णयाला अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचेही समर्थन आहे.
रशियाला पूर्ण तंबाखूमुक्त करण्यासाठी हे प्रयत्न आहेत. रशियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २०३३ मध्ये या निर्णयाचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. कारण सध्याची लहान मुले त्या वेळी १८ वर्षांची होतील. रशियन संसदेच्या आरोग्य समितीच्या एका सदस्याने सांगितले की, हे लक्ष्य अगदी बरोबर आहे. पूर्ण विचारांती हा निर्णय घेण्यात येत आहे, पण अशा प्रकारे बंदी आणणे योग्य आहे का? याबाबत मात्र अनिश्चितता आहे. यासाठी अन्य मंत्रालयांशी चर्चा करावी लागेल, असाही एक मतप्रवाह आहे. याबाबतचे कागदपत्रे अर्थमंत्रालयासह अन्य मंत्रालयांना पाठविण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. २०१६ मध्ये रशियात धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत दहा टक्के घट झाली आहे.

Web Title: Cigarette ban in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.