गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:42 IST2025-03-22T07:41:10+5:302025-03-22T07:42:49+5:30

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे.

Civil war Thousands dead Will this Muslim country be divided into two parts sudan military announces retakes presidential palace | गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा

गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा

सुदानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध आता एका निर्णायक वळणावर जाऊन पोहोचले आहे. या गृहयुद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. आता, सुदानच्या लष्कराने शुक्रवारी (२१ मार्च २०२५) राजधानी खार्तूममधील राष्ट्रपती भवनावर पुन्हा कब्जा केल्याची घोषणा केली. हे सैन्य आता पॅरामिलिट्री रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) च्या सदस्यांचा शोध घेत आहे. 

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे. येथे सुरू असलेल्या या गृहयुद्धात एकाबाजूला सुदानचे सैन्य, तर दुसऱ्याबाजूला आरएसएफ यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दोघांचाही हेतू सुदानची सत्ता मिळवणे असा आहे.

राजवाड्यावर कब्जा म्हणजे सुदान लष्कराचा मोठा विजय - 
राजवाड्यावर पुन्हा एकदा कब्जा मिळवणे हा सुडान लष्करासाठी एक मोठा विजय आहे. कारण, युद्धाच्या सुरुवातीला अर्थात एप्रिल २०२३ मध्ये खार्तुमचा अधिकांश भाग हा आरएसएफच्या ताब्यात गेला होता. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वीच, "आम्ही राजवाड्यापासून माघार, असे समजू नका," असे, आरएसएफ नेते जनरल मोहम्मद हमदान दगालो यांनी म्हटले होते.

सुदानच्या सैनिकांनी साजरा केला विजय -
दरम्यान, सुदानचे सैनिक आणि सहकारी मिलिशियांनी हळूहळू शहराच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागावर कब्जा केला आणि आपल्या लक्ष्यांवर मोठा हल्ला केला. गुरुवारी सकाळच्या सुमारास लष्कराने राजवाड्याच्या दक्षिणेकडे आरएसएफच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यावेळी, आरएसएफ सैनिक पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. यानंतर, शुक्रवारी (२१ मार्च २०२५) सैन्यासोबत लढणाऱ्या सुदानी मिलिशिया सैनिकांनी विजय साजरा केला.

Web Title: Civil war Thousands dead Will this Muslim country be divided into two parts sudan military announces retakes presidential palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक