बलात्कारपीडितेचा कंपनीविरुद्ध दावा
By admin | Published: January 31, 2015 01:51 AM2015-01-31T01:51:45+5:302015-01-31T01:51:45+5:30
नवी दिल्लीत उबर टॅक्सी चालकाकडून बलात्कार झालेल्या २५ वर्षांच्या युवतीने उबर कंपनीविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे
न्यूयॉर्क : नवी दिल्लीत उबर टॅक्सी चालकाकडून बलात्कार झालेल्या २५ वर्षांच्या युवतीने उबर कंपनीविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. आॅनलाईन टॅक्सी पुरविणा-या या कंपनीने सुरक्षेच्या मूळ नियमांचे पालन केले नाही, असा या युवतीचा आरोप आहे. कंपनीने चालकांची चौकशी करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे हा हल्ला व अपमान घडला असे तिने या खटल्यात म्हटले आहे.
कॅलिफोर्निया फेडरल न्यायालयात हा ३६ पानी दावा दाखल करण्यात आला असून, त्यात या महिलेचे नाव देण्यात आलेले नाही. अमेरिकेतील दाव्यात तिचे प्रातिनिधिक नाव जेन डो असे ठेवण्यात आले आहे. ४० अब्ज डॉलर किंमतीची ही सेवा जगातील २५० शहरात चालू आहे. अमेरिकन न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात महिला अधिकाऱ्याने नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केलेली नाही. खटल्यातील ज्युरींनी या हल्ल्यामुळे झालेले तिचे आर्थिक व शारीरिक नुकसान तसेच तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक प्रतिष्ठेला बसलेला धक्का लक्षात घेऊन नुकसान भरपाईची रक्कम ठरवावी असे तिने म्हटले आहे.