माकडाच्या सेल्फीवरून वाद

By admin | Published: August 8, 2014 02:14 AM2014-08-08T02:14:14+5:302014-08-08T02:14:14+5:30

माकडाने स्वत:च्याच काढलेल्या छायाचित्रवर माझा हक्क आहे, असा दावा छायाचित्रकाराने केला आहे. सध्या हा स्वामित्व हक्काचा वाद चांगलाच गाजत आहे.

Claim on Macdays Selfie | माकडाच्या सेल्फीवरून वाद

माकडाच्या सेल्फीवरून वाद

Next
>न्यूयॉर्क : माकडाने स्वत:च्याच काढलेल्या छायाचित्रवर त्याचा नव्हे, तर त्याने माङया कॅमे:याने ते काढल्यामुळे त्यावर माझा हक्क आहे, असा दावा छायाचित्रकाराने केला आहे. सध्या हा स्वामित्व हक्काचा वाद चांगलाच गाजत आहे. 
इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर 2क्11 मध्ये डेव्हिड स्लेटर हे छायाचित्र काढण्यासाठी गेले होते. ते माकडांची छायाचित्रे काढत असताना एका माकडाने त्यांचा कॅमेरा पळविला. त्याने कॅमेरा हाताळल्यामुळे त्यातून अनेक छायाचित्रे निघाली व त्यात काही उत्तम छायाचित्रेही निघाली. त्यात त्या माकडाने स्वत:चेच (सेल्फी) काढलेले छायाचित्रही होते. या छायाचित्रवरून  वाद निर्माण झाला.  डेव्हिड स्लेटर यांचे म्हणणो असे की, त्या छायाचित्रवर माझा हक्क आहे; परंतु विकिपीडियाने त्यावर त्या माकडाचा हक्क असल्याचे म्हटले; परंतु प्राण्यांना स्वामित्व हक्क लागू होत नसल्यामुळे हे सेल्फी (छायाचित्र) स्वामित्व हक्कमुक्त आहे. विकिपीडियाने हे छायाचित्र सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे माङो आर्थिक नुकसान झाल्याचा दावा डेव्हिड स्लेटर यांनी केला आहे व विकिपीडियाविरुद्ध ते 3क् हजार डॉलरचा खटलाही दाखल करण्याच्या विचारात आहेत. (वृत्तसंस्था)
 
4जी व्यक्ती छायाचित्र काढते, त्यावर तिचा स्वामित्व हक्क असतो, असे स्वामित्व हक्क कायदा म्हणतो. त्यानुसार त्या सेल्फीवर माकडाचा हक्क असल्याचे विकिपीडियाने म्हटले आहे. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच जगात माकडाने 
काढलेला सेल्फी म्हणून प्रसारमाध्यमांनी त्याची नोंद घेतली. 

Web Title: Claim on Macdays Selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.