अमेरिकेत कोरोनाचा कहर; एका दिवसात 540 जणांचा मृत्यू, न्यूयॉर्कला पोहोचले 1,000 खाटांचे नौदलाचे जहाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 03:55 PM2020-03-31T15:55:22+5:302020-03-31T16:29:29+5:30
कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
न्यूयॉर्क - कोरोना व्हायरस महामारीसमोर सुपरपावर अमेरिकाही हतबल झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्येच समोर आले आहे. येथे सोमवारी एकाच दिवसात तब्बल 540 जणांचा मृत्यू झाला. ही अमेरिकेतील मृतांची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
जहाजाचे स्वागत -
न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथील हडसन नदीच्या किनाऱ्यावर जाऊन लोकांनी अमेरिकन नौदलाच्या या कंफर्ट जहाजाचे स्वागत केले. हे एक कन्व्हर्टेड ऑइल टँकर आहे. याला याला पांढरारंग देऊन त्यावर लाल रंगाचा क्रॉस काढला आहे. यासोबतच अनेक सपोर्ट शिप्स आणि हेलिकॉप्टरदेखील येथे आले आहेत. या जहाजात ज्यांना कोरोना नाही, अशा रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.यामुळे येथील इतर रुग्णांलयांतील संसाधने आणि कोरोनाने पीडित रुग्णांसाठी वापरता येतील. न्यूयॉर्क सिटीच्या महापौरांनी ही अगदी युद्धजन्य परिस्थिती असल्याचे म्हटेल आहे.
We will fight every way we can to save every life we can.
— Andrew Cuomo (@NYGovCuomo) March 30, 2020
Thank you, USNS Comfort. Welcome to New York. pic.twitter.com/ppGrJ0rGE5
प्रत्येकाला वाचविण्याचा प्रयत्न -
गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी या जहाजाचे स्वागत करत एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, या जहाजात 1000 बेड, 1200 मेडिकल स्टाफ, 12 ऑपरेशन थिएटर, लॅब, फार्मसी आहे. प्रत्येकाचा जीव वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल.
अतापर्यंत अमेरिकत तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू -
जगात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेला झाला आहे. आतापर्यंत येथील संक्रमित लोकांची संख्या 164,266 वर पोहोचली आहे. येथे आतापर्यंत तब्बल 3,170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अमेरिकेतील अनेक राज्यांत आणीबाणीची घोषणाही करण्यात आली आहे. शाळा आणि उद्योग बंद करण्यात आले आहेत. याशिवाय नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे, असेही येथे वारंवार सांगण्यात येत आहे.