दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा; अधिकृत चौकशीत स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 10:41 AM2021-06-25T10:41:43+5:302021-06-25T10:42:14+5:30

सध्या सिथोल यांना मानसिक आरोग्य कायद्याखाली निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.

Claims to have given birth to ten babies; The official inquiry clarified in south africa | दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा; अधिकृत चौकशीत स्पष्ट

दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा; अधिकृत चौकशीत स्पष्ट

googlenewsNext

गौतेंग प्रांत (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकन महिला गोसियामी सिथोल (३७) यांनी या महिन्यात दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा अधिकृत चौकशीत खोटा स्पष्ट झाला. गौतेंग प्रांतातील कोणत्याही रुग्णालयात दहा बाळांचा जन्म झाल्याची नोंद नाही, असे प्रांतीय सरकारने निवेदनात म्हटले. वैद्यकीय चाचण्यांत तर सिथोल या अशात गरोदरदेखील नव्हत्या हे समोर आले.

सध्या सिथोल यांना मानसिक आरोग्य कायद्याखाली निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. दहा बाळांना जन्म दिल्याची कथा सांगितली जाण्यामागची कारणे मात्र निवेदनात देण्यात आलेली नाहीत. दहा बाळांच्या जन्माची बातमी पहिल्यांदा ‘प्रिटोरिया न्यूज’ने दिली होती. 

Web Title: Claims to have given birth to ten babies; The official inquiry clarified in south africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.