नायजेरियात विरोधी पक्षाने केला दावा
By admin | Published: April 1, 2015 01:29 AM2015-04-01T01:29:18+5:302015-04-01T01:29:18+5:30
नायजेरियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी नेते मोहंमद बुहारी यांनी राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन यांच्यावर आघाडी घेताच विरोधी पक्षांनी विजयाचा दावा केला आहे
Next
अबुजा : नायजेरियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी नेते मोहंमद बुहारी यांनी राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन यांच्यावर आघाडी घेताच विरोधी पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. जर या दाव्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले, तर नायजेरियाच्या इतिहासात पहिल्यांदा सत्तेचे लोकशाही हस्तांतरण होईल. नायजेरियाचे एकूण ३६ प्रांत आणि केंद्रशासित राजधानी क्षेत्रापैकी ३२ ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. यात बुहारींच्या आॅल प्रोग्रेसिव्ह काँग्रेसने (एपीसी) १९ आणि जोनाथन यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) १२ प्रांत आणि केंद्रशासित राजधानी क्षेत्रात विजय प्राप्त केला आहे. (वृत्तसंस्था)