मंगळ ग्रहावर महिला दिसल्याचा दावा
By admin | Published: August 12, 2015 01:22 AM2015-08-12T01:22:32+5:302015-08-12T01:22:32+5:30
मंगळावर संशोधन करत असलेल्या नासाच्या रोव्हरने मंगळाच्या घेतलेल्या छायाचित्रात एक मानवी आकृती दिसत असल्याचा दावा एलियन्सवर विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांनी केला आहे.
केप कॅनाव्हेराल : मंगळावर संशोधन करत असलेल्या नासाच्या रोव्हरने मंगळाच्या घेतलेल्या छायाचित्रात एक मानवी आकृती दिसत असल्याचा दावा एलियन्सवर विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांनी केला आहे. ही आकृती एखाद्या महिलेची असावी असेही मानण्यात येत आहे.
यूएफओ सायटिंग डेलीनुसार या छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ८ ते १० सें.मी.ची असून, ती एक महिला असावी. या महिलेला दोन हात असून, डोक्यावर केसही दिसत आहेत.
एलियन्सचा शोध घेणाऱ्या स्कॉट सी वेअरिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पुतळा आहे की जिवंत प्राणी असा प्रश्न पडला आहे; पण पुतळा असेल तर तो एवढा लहान कसा व तो सहजगत्या नष्ट होऊ शकतो, त्यामुळे हा जिवंत प्राणी असावा. हे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
- माणसाने अवकाशाात बांधलेल्या अंतराळ स्थानकावर उडत्या तबकड्यांची वा यूएफओची नजर आहे काय? यूएफओवर ज्यांचा विश्वास आहे अशांसाठी या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.
- नासाने अंतराळ स्थानकावर एक कॅमेरा बसवला असून, या कॅमेऱ्याने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या वस्तू टिपल्या आहेत. या वस्तू अंतराळ स्थानकाभोवती फिरताना दिसत आहेत. या उडत्या तबकड्या किंवा परग्रहावरील वस्तू आहेत असे मानले जात आहे; पण नासाने हे सर्व दावे फेटाळले आहेत.