पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पेटला संघर्ष, तुफान गोळीबारानंतर तोरखम सीमा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 03:15 PM2023-09-06T15:15:54+5:302023-09-06T15:16:31+5:30

Clash erupts between Pakistan and Afghanistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेली तोरखम बॉर्डर बंद करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांकडून झालेल्या तुफान गोळीबारानंतर तोरखम बॉर्डर टर्मिनलला कुठल्याबी प्रकारची ये जा करण्यासाठी बंद करण्यात आले आहे. 

Clash erupts between Pakistan and Afghanistan, Torkham border closed after storm of firing | पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पेटला संघर्ष, तुफान गोळीबारानंतर तोरखम सीमा बंद 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पेटला संघर्ष, तुफान गोळीबारानंतर तोरखम सीमा बंद 

googlenewsNext

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेली तोरखम बॉर्डर बंद करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांकडून झालेल्या तुफान गोळीबारानंतर तोरखम बॉर्डर टर्मिनलला कुठल्याबी प्रकारची ये जा करण्यासाठी बंद करण्यात आले आहे. 

पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आली आहे.

याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन्ही देशांमध्ये असलेली तोरखम बॉर्डर बंद करण्यात आली होती. मात्र हा वाद पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध बिघडल्यामुले झाला होता. पूर्व अफगाणिस्तानमधील प्रांत नंगाहारमधील तालिबानी प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या सीमा बंद करण्यात आलेली आहे. मात्र त्याबाबत आम्ही नंतर चर्चा करणार आहोत.

अफगाणिस्तानमध्ये जेव्हापासून तालिबानची सत्ता आली आहे तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध काहीसे बिघडलेले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानमधील खोस्त आणि कुनार येथे एअरस्ट्राइक करून तालिबानच्या ३६ जणांना ठार मारले होते. मात्र पाकिस्तानने एअरस्टाइकचे वृत्त फेटाळून लावले होते.  

Web Title: Clash erupts between Pakistan and Afghanistan, Torkham border closed after storm of firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.